शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

महापालिकेचे कर्मचारी 'कर्तव्या'पासून मागे हटले पण पोलीस पुढे सरसावले; मृतदेह उचलण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 7:44 AM

पीपीई किट घालून पोलिसांनी दाखवून दिले धैर्य 

ठळक मुद्देकोरोना झालेला नसल्याचे झाले निष्पन्न; मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

लक्ष्मण मोरे पुणे : एकीकडे महापालिका आयुक्तांपासून सर्व अधिकारी कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर, दुसरीकडे मात्र, पालिकेचेच काही कर्मचारी कर्तव्यापासून तोंड फिरवत आहेत. असाच अनुभव पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये आला. कोरोना संशयिताचा मृतदेह उचलण्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यावर न घाबरता त्यांच्याकडून पीपीई किट घेऊन पोलिसांनीच हा मृतदेह उचलला. पालिकेचे कर्मचारी कर्तव्यात चुकले; परंतु पोलीस मात्र कर्तव्याला जागल्याची घटना शुक्रवारी घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये एक तरुण जोडपे राहते. हे जोडपे मुळचे तामिळनाडू येथील आहे. यातील पुरुष ३४ वर्षांचा तर त्यांची पत्नी २९ वर्षांची आहे. या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे. यातील पती टाटा कंपनीमध्ये उच्च पदस्थ अभियंता म्हणून नोकरी करीत होते. ते सध्या पुणे मेट्रोचे काम करीत होते. त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयाद्वारे ऑनलाईन उपचार घेत होते. उपचार घेत असताना त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या होत्या. घरामध्ये असतानाच त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. 

घरामध्ये एकट्याच असलेल्या त्यांच्या पत्नीने सोसायटी चेअरमन आणि अन्य लोकांना मदतीसाठी बोलावले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिलेला असल्याने मृतदेहाला हात लावण्यास कोणी तयार होईना. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षाकडून चतुःश्रुंगी पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस कर्मचारी महेश बामगुडे, अनिकेत भोसले, दीपक फापाळे आणीनपोलिस मित्र गब्बर शेख घटनास्थळी धावले. 

त्यांनी सर्व माहिती घेतल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले खरे; परंतु त्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. वास्तविक त्यांच्याकडे पीपीई किट होते. तरीही त्यांनी नकार दिल्यावर मृताच्या पत्नीची अवस्था अधिकच बिकट झाली. त्यांनी गयावया करूनही पालिका कर्मचारी नकारावर ठाम होते. पोलिसांची विनंतीही पालिका कर्मचाऱ्यांनी मानली नाही. 

पोलिसांनी निश्चय करीत पालिका कर्मचाऱ्यांना पीपीई किटची मागणी केली. बामगुडे आणि शेख यांनी हे किट अंगावर चढवत पोलिसांनी हा मृतदेह नवव्या मजल्यावरून खाली आणला. शेख यांच्या रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात हा मृतदेह पोचविला. तेथे या मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यांच्या छातीत पाणी झालेले होते, परंतु त्यांना कोरोना झालेला नसल्याचे निष्पन्न झाले. सर्व सोपस्कार पडल्यावर पोलिसांनी हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ------------ आजारी मुलाला नेण्यासाठी आई वडील आले पण...

आजारी असलेल्या आपल्या मुलाला नेण्याकरिता तामिळनाडूवरून आई-वडील दोन दिवसांपूर्वी निघाले. कोरोना नसल्यास मुलाला गावी नेऊन उपचार करण्याचे त्यांनी ठरविले होते. परंतु, ते पुण्यात पोहचण्यापूर्वीच त्यांच्या मुलाने घरातच जीव सोडला होता. -------------- पालिकेचे एक आरोग्य निरीक्षक आणि एक अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांच्याकडे पीपीई किट होते. परंतु, त्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यासाठी कर्मचारी बोलावले नाहीत की रुग्णवाहिका सुद्धा बोलावली नाही. पोलिसांनाच रुग्णवाहिकेचा बंदोबस्त करावा लागला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसDeathमृत्यू