मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण: दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:40 IST2026-01-22T12:40:08+5:302026-01-22T12:40:48+5:30

याप्रकरणी यापूर्वी मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने फेटाळला आहे.

Mundhwa land scam case: Digvijay Patil's anticipatory bail application rejected | मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण: दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण: दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे :मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकरणातील तथ्ये पाहता, अर्जदार आरोपी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्याबाबत अयशस्वी ठरला आहे. या टप्प्यावर आरोपी दिलासा मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी यापूर्वी मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने फेटाळला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे भागीदार असलेल्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस’ कंपनीने मुंढवा भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ३०० कोटी रुपयांत या जमिनीचा व्यवहार झाला आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तेजवानीसह, दिग्विजय पाटील आणि तत्कालीन सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी पाटील याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अर्जदार आरोपी तपास अधिकाऱ्यासमोर तीन वेळा हजर राहिले असून, त्यांनी तपासात सहकार्य केले आहे. अर्जदार यांनी फिर्यादीची फसवणूक केलेली नसून कोणतेही खोटे व बनावट दस्तऐवज तयार केलेले नाहीत. अर्जदाराची पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यक नाही, असा युक्तिवाद पाटील यांच्या वकिलांनी केली. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा संदर्भ दिला.

या गुन्ह्यात राज्य सरकारची मोठी फसवणूक झाली आहे. आरोपींच्या बँक खात्यांची पडताळणी आणि साक्षीदारांची तपासणी सुरू आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Web Title : मुंढवा भूमि घोटाला: दिग्विजय पाटिल की अग्रिम जमानत याचिका खारिज

Web Summary : मुंढवा भूमि घोटाले में दिग्विजय पाटिल की अग्रिम जमानत याचिका पुणे कोर्ट ने खारिज कर दी। पार्थ पवार की कंपनी भी इसमें शामिल है। कोर्ट ने अपराध की गंभीरता और जांच जारी रहने को कारण बताया। पहले मुख्य आरोपी शीतल तेजवानी की जमानत भी खारिज हो चुकी है।

Web Title : Mundhwa Land Scam: Digvijay Patil's Anticipatory Bail Rejected

Web Summary : Digvijay Patil's anticipatory bail plea in the Mundhwa land scam, involving Parth Pawar's company, was rejected by a Pune court. The court cited the severity of the crime and ongoing investigation as reasons. Previously, the main accused, Sheetal Tejwani, also had her bail denied.