पुण्यातील महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी; भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By राजू हिंगे | Updated: November 26, 2023 14:27 IST2023-11-26T14:26:36+5:302023-11-26T14:27:01+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कार्यवाही करण्याचे आदेश

पुण्यातील महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी; भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केली आहे. त्यावर शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रादारे ही मागणी केली आहे. या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरच मान्य होउन महम्मदवाडीचे महादेववाडी होईल असा विश्वास भानगिरे यांनी व्यक्त केला.