शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:24 IST

खासदार गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातायेत

पुणे : खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याचे समोर आले आहे. लंके यांनी मारणेकडून शाल आणि श्रीफळ स्वीकारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. नवनिर्वाचित अशा प्रकारे खासदार गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर ते काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यावेळी मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गजा मारणेच्या भेटीनंतर लंकेंवर टीकाटिपणी देखील होऊ लागलीये. भेट घेण्याचं कारण लंके यांनी सांगावं याबाबत राजकीय वर्तुळातून विचारणा होत आहे. 

गजा मारणेवर वर याआधी देखील खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यांमधून त्याची सुटका झाली. त्याची सुटका झाल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यंतरी गजा मारणेच्या बायकोने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षाने संधी दिली तर आम्ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया मारणेने दिली होती.  

टॅग्स :Puneपुणेnilesh lankeनिलेश लंकेPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीkothrudकोथरूडNCPराष्ट्रवादी काँग्रेस