शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

By admin | Updated: July 7, 2015 03:11 IST

शालेय पोषण आहार योजना शासनादेशाप्रमाणे स्वतंत्र योजनेमार्फत राबविण्यात यावी. सर्व सेवकांचे वेतन आॅनलाईन पद्धतीनेच करण्यात यावे.

बारामती : शालेय पोषण आहार योजना शासनादेशाप्रमाणे स्वतंत्र योजनेमार्फत राबविण्यात यावी. सर्व सेवकांचे वेतन आॅनलाईन पद्धतीनेच करण्यात यावे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी. यांसह इतर मागण्यांकरिता बारामती तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवारी (दि. ६ जुलै) एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. याबाबत बारामती तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बबन गायकवाड यांनी सांगितले, की पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटक अनेक कारणांनी असमाधानी आहे. अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाच्या मुख्य जबाबदारीकडे पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याची खंत, नेहमीच असलेला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक दबाब यामुळे कर्तव्यापासून दूर जात असल्याची भावना शिक्षण क्षेत्रांतील सेवकांना आहे. यामुळे या क्षेत्रातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी, तसेच आपली अस्मिता कायम ठेवण्यासाठी या एकदिवसीय आंदोलनाचा निर्णय घेतला. तालुक्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना, वर्ग व तुकड्यांना त्वरित अनुदान मिळावे. शाळांना देण्यात येणाऱ्या वेतनावर अनुदान सहाव्या वेतन आयोगानुसार थकबाकीसह करावी, असे मत संघटनेचे माजी अध्यक्ष एन. डी. टेंगल यांनी सांगितले. या वेळी या मागण्यांचे निवेदन पंचायत समितीतर्फे विस्तार अधिकारी संजय जाधव यांनी स्वीकारले. तर, प्रशासकीय भवन येथे या निवदेनाचा स्वीकार नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार अडागळे यांनी स्वीकारले. या वेळी बी. एल. गायकवाड, बी. जे. कोकरे, बी. एस. माने, आर. ए. धायगुडे, ए. एस. धुमाळ, एस. एल.जगताप, एस. एम. वाबळे, व्ही. एस. कांबळे, आर. बी. बनकर, जे. पी. नाकुरे, एम. डी. कोकरे, सी. एम. जाधव, ए. जी. साळुंके, डी. जी. बुरंगले, यु. एम. तावरे आदी मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.