Pune Crime: सासू भाजपची सरपंच; लग्नात ५० तोळे सोनं, हुंड्याची मागणी, जबरदस्ती गर्भपात, सुनेने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:07 IST2026-01-27T11:06:26+5:302026-01-27T11:07:06+5:30
Uruli Kanchan Dowry Harassment: लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करण्यात येत होती, तसेच चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही असे आरोप करण्यात आले

Pune Crime: सासू भाजपची सरपंच; लग्नात ५० तोळे सोनं, हुंड्याची मागणी, जबरदस्ती गर्भपात, सुनेने उचलले टोकाचे पाऊल
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पती, सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी हेमलता बाळासाहेब मगर (वय 50, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दिप्ती चौधरीचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता. लग्नामध्ये ५० तोळे सोने देण्यात आले होते. विवाहानंतर दि. 25 डिसेंबर 2019 पासून 24 जानेवारी 2026 दरम्यान दिप्ती हिस हिला चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करण्यात येत होती. तसेच एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला, तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतले जात होते. तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिस हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आत्महत्येस पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे कारणीभूत असल्याचा आरोप आहे. आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या भाजप पक्षाकडून झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत असून, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशन करत आहे.