शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आई, नको ना सोडून जाऊस मला!

By admin | Updated: September 11, 2015 04:42 IST

बाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते.

- सुवर्णा गवारे-नवले, पिंपरीबाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते. बेरोजगारांसाठी पाळणाघर हा उत्पन्नाचा नवा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पाळणाघरांची संख्या वाढली आहे. धकाधकीच्या जीवनात पाळणाघरे ही पालकांसाठी सोईस्कर आहेत, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. पण बालकांच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी पती-पत्नी दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मुलाचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी पाळणाघराचा पर्याय त्यांनी शोधला आहे. फ्लॅट, दोन रूमच्या खोल्यांमध्ये पाळणाघरे सुरूआहेत. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ही बालके सुदृढ होत नाहीत. या बाबींकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात बालकाला योग्य संस्कार व आहाराची गरज असते, त्या वयातच ही बालके घरापासून दुरावली जातात. यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते. मुले अबोल बनतात. हा कालावधी बौद्धिक विकासाचा असतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी सांगितले.सकाळच्या वेळी मुले पाळणाघरात सोडली जात आहेत. सोबत खाण्यापिण्यासाठी मुलांना डबा दिला जातो. काही वेळा मुलांना स्वयंपाक बनवून देणे शक्य नसल्याने त्यांना पाळणाघरातील आया खाऊ तयार करून देतात. पाळणाघरात मुलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आहाराकडे व्यवस्थापकांना लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलाची वाढ खुंटली आहे की, कुपोषणात्मक दृष्टीने काही समस्या मुलांच्या आहेत, अशा बाबींकडे कुटुंबीयाचे लक्ष असते. यामुळे अशा मुलांचा सांभाळ करणे अवघड होते. पाळणाघरात मूल तासावर ठेवण्याचेही पैसे घेतले जातात. काही ठिकाणी २००, तर काही ठिकाणी ५०० रुपये शुल्क आहे. तर काही पाळणाघरांचे मासिक शुल्क ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. पाळणाघरात अगदी ६ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले ठेवली जातात. पाळणाघरे ही फक्त मूल सांभाळणे व त्याची सुरक्षेची जबाबदारी घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. यापुढे जाऊन पाळणाघरात मनोरंजनाच्या दृष्टीने कोणतेही साधन नसते. शहरस्तरावर महापालिके चे एकही पाळणाघर नाही. पाळणाघरासाठी आलेल्या अर्जांपैकी एकही अर्ज पात्र ठरला नसल्यामुळे शासकीय पाळणाघरे शहरात नाहीत. नोकरी करीत असलेल्या पाच वर्षे वयाच्या आतील बालकांसाठी पाळणाघराची सुविधा आहे. बचत गट अथवा नोंदणीकृत संस्था तीन वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. किमान १५ बालके असणे आवश्यक आहे. विक्रीकर नंबर असलेले कोटेशन सादर केल्यानंतर १० हजार रुपये व इतर सुविधांसाठी १२ हजार रुपये सहा महिन्यांच्या टप्प्यावर दिले जातात.- संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी पाळणाघरे ही मुलांचा सांभाळ करण्यापुरती झाली आहेत. मुलांच्या आहाराकडे, शाळापूर्व शिक्षणाचा पाळणाघराशी काही संबंध नाही. पाळणाघर अर्थार्जनाचे साधन बनले आहे. शहरातील पाळणेघरे नोंदणीकृत नाहीत. शहरात दर्जेदार पाळणाघरे निर्माण होण्याची गरज आहे. - अच्युत बोरगावकर, अध्यक्ष, तथापि संस्था