बिबवेवाडीत खडी भरलेल्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने मायलेकी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 10:14 IST2023-02-17T10:12:49+5:302023-02-17T10:14:21+5:30

बिबवेवाडीतील जंक्शन सिग्नल त्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला...

mother and daughter was killed on the spot truck ran over him in Bibwewadi | बिबवेवाडीत खडी भरलेल्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने मायलेकी जागीच ठार

बिबवेवाडीत खडी भरलेल्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने मायलेकी जागीच ठार

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात डांबर मिश्रित खडी भरलेल्या हायवा ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. बिबवेवाडीतील जंक्शन सिग्नल त्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. रूपाली कल्पेश बोरा (वय 38, रा. सु पार्श्वनाथ सोसायटी बिबवेवाडी) आणि गरिमा कल्पेश बोरा (वय 8) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. ट्रक चालक राहुल कुंडलिक जाधव (वय 32) याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी असतानाही डांबर मिश्रित खडीने भरलेला हायवा ट्रक घेऊन चालक राहुल जाधव हा जात होता. यावेळी त्याने रूपाली बोरा चालवत असलेल्या दुचाकी मोपेडला जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकी वरील रूपाली आणि गरिमा दोघेही खाली कोसळल्या. त्यानंतर हायवा ट्रकचे पाठीमागील चाक या दोघींच्या अंगावरून गेल्याने दोघींचाही मृत्यू झाला. बिबीवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: mother and daughter was killed on the spot truck ran over him in Bibwewadi