Bhigwan Case: आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले, नेमकं काय म्हणाले पोलीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:10 IST2026-02-20T16:09:21+5:302026-02-20T16:10:08+5:30

या घटनेत कायदा सुव्यवस्था राखणे प्रत्येकाची जबाबदारी असून ती राखण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत

Mother and daughter meet; They were presented before the court and their statements were recorded, what exactly did the police say? | Bhigwan Case: आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले, नेमकं काय म्हणाले पोलीस?

Bhigwan Case: आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले, नेमकं काय म्हणाले पोलीस?

पुणे: भिगवण अपहरण प्रकरणात तरुण आणि तरुणीबाबत खळबळजनक खुलासे समोर येऊ लागले आहेत. लग्नाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तरुणीला पळवल्याचे प्रकरण एक बनाव असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मी माझ्या मर्जीने या मुलासोबत पळून गेल्याचे तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. पोलिसांकडून दोघांचा शोधही सुरु होता. अखेर तरुणासोबत पळून गेलेली तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. त्या तरुणीने अपहरणाचा आरोप फेटाळत पोलिसांना शपथपत्र आहे. याबाबत आता पुणे ग्रामीण पोलीसचे अधीक्षक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. 

गिल म्हणाले, भिगवण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणी आणि आरोपी आले होते. पोलीस तपासात जाब जबाब नोंदवण्यात आले आहेत. आई आणि भाऊ यांची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी त्याचं मत मांडल आहे. तरुणीने तिचे मत त्या दोघांसमोर मांडले. दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत. तरुणीने यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून मत मांडले होते. ती स्वतः हून गेली होती. तिच्या आईचे मत वेगळे आहे. आम्ही तपास करत आहोत. कोर्टासमोर या तिघांचे जाब जबाब झाले आहेत

आई आणि भावाने मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण झाल्याचे सांगितले होते. त्याबाबत विचारले असता गिल म्हणाले, दोन्ही मत वेगवेगळे आहे. तक्रारीत मत वेगळे आहे. मात्र तरुणीचे मत वेगळे आहे. सखोल तपास आम्ही करत आहोत. वस्तुस्थिती आम्ही बारकाईने तपासात आहोत. त्याप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत

मुलीच्या सुरक्षेबाबत त्यांनी सांगितले की, आईकडे जाण्यास तरुणीने नकार दिला आहे. तिला कोणाकडे जायचे हे तिला विचारले जाईल. किंवा मुलींच्या वसतिगृहात तिला ठेवले जाईल. आम्ही तपास करीत आहोत. आम्ही मुलीच्या आईला मुलीला भेटण्याची परवानगी दिली. त्यांची भेट झाली आहे. कायदा सुव्यवस्था राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती राखण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत. आम्ही गुन्हा दाखल झाल्यावर शोध घेतला. पुरावे तपासले आहेत. तपास सुरु आहे. मिरची पूड आई आणि भावाच्या दोनोळीत टाकली. याबाबत मेडिकल करण्यात आले होते. त्याचा अहवाल समोर आला कि बोलू असे गिल यांनी सांगतले आहे. तसेच तरुण आरोप आमच्या ताब्यात असून चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

Web Title : भिगवन मामला: भागी हुई लड़की पेश; पुलिस ने दर्ज किए बयान; जांच जारी

Web Summary : भिगवन अपहरण मामले में आया नया मोड़। लड़की ने भागने का दावा किया, अपहरण से इनकार। पुलिस जांच जारी, बयान दर्ज। उसने अपनी मां के साथ जाने से इनकार किया, सुरक्षा प्राथमिकता। मिर्च स्प्रे हमले पर विवरण का इंतजार।

Web Title : Bhigwan Case: Eloped Girl Appears; Police Record Statements; Investigation Ongoing

Web Summary : Bhigwan abduction case reveals twist. Girl claims elopement, denies kidnapping. Police investigation ongoing, statements recorded. She refused to go with her mother, safety prioritized. Details on alleged pepper spray attack awaited.