शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देशात अडीच हजारांहून अधिक कोरोना संशयितांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 3:01 AM

केरळमधील तीन प्रवासी : ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने आले निगेटिव्ह

पुणे : चीनसह अन्य कोरोना विषाणुबाधित देशांतून भारतात परतलेल्या २ हजार ६३८ प्रवाशांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने प्रयोशाळांमध्ये तपासण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ तीन प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यातील दोघांना घरी सोडण्यात आले आहे.

चीनसह अन्य बाधित देशांतून १ ते १७ जानेवारी या कालावधीत भारतात आलेल्या प्रवाशांचाही पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्यानुसार १८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील एकूण २ हजार ६३८ प्रवाशांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) सह देशातील अन्य काही प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी केरळमधील तीन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.उर्वरीत सर्व प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. नमुने तपासण्यात आलेल्या एकुण प्रवाशांपैकी १३०८ प्रवासी हे चीनमधील वुहान येथून आणण्यात आलेले आहेत. उर्वरीत १३३० प्रवासी हे देशभरातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले होते. त्यांच्यापैकी ३ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली होती.दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत प्रवाशांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत.राज्यात ६६ जणांची तपासणीआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बाधित भागातून २२८ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यानुसार ६५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना