नाशिक विमानतळ नामांतरासाठी ९ ऑगस्टला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST2021-07-20T04:08:22+5:302021-07-20T04:08:22+5:30

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी सांगितले की, नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याच्या बऱ्याच जुन्या मागणीकडे सातत्याने ...

Morcha on 9th August for renaming of Nashik Airport | नाशिक विमानतळ नामांतरासाठी ९ ऑगस्टला मोर्चा

नाशिक विमानतळ नामांतरासाठी ९ ऑगस्टला मोर्चा

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी सांगितले की, नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याच्या बऱ्याच जुन्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळे आंबेडकरी जनतेत रोष आहे. त्यासाठीच ९ ऑगस्टला नाशिक येथील मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना सहभागी होणार आहेत.

“राजकीय पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते तानसेन ननावरे यांनी केले. माजी आमदार जयदेव गायकवाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दयाल बहादुरे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगरसेविका लता राजगुरू, दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम, रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे, भीम छावाचे अध्यक्ष श्याम गायकवाड, रिपब्लिकन युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.

Web Title: Morcha on 9th August for renaming of Nashik Airport