शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Monsson 2023: पुण्यात वरुणराजाचे आगमन; शहरासह उपनगरांत पावसाच्या सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 11:13 IST

काल मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती....

पुणे : अखेर जून महिन्याच्या शेवटी पुण्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज (२४ जून) सकाळपासूनच पुणे शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांत पावसाच्या सरी आल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. तर काही भागांंत जोरदार पाऊस झाला आहे. काल मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती.

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे जून महिन्यातील सरासरी पावसाची नोंद झालेली नाही. जून महिन्यात सरासरी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ २०.७ मिमीची नोंद झाली होती. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने पुणेकर हैराण होते. पण आता अखेर शहरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाल्याने पुणेकर सुखावले आहेत.

हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येणार असल्याचा अंदाज दिला होता. पण, एवढा उशीर करेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत अनेकदा सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाचा दिलासा, अशी स्थिती पुणेकरांनी अनुभवली. तापमानाचा पाराही चाळिशीच्या पार पोहोचला होता. जूनमध्ये साधारणपणे शंभर ते दीडशे मिमीच्या दरम्यान पावसाची सरासरी असते. यंदा मात्र विदारक चित्र आहे.

स्थानिक हवामानही बदलतेय :

पुणे जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दरवर्षीच्या पावसाची सरासरी साधारणपणे १२०८ मिमी होती. गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल झाला आहे. आता ७५० ते ८०० मिमी पाऊस सरासरी पडतो. हवामान बदलाचा हा परिणाम असू शकतो. पुण्याच्या तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. एरवी चाळिशी पार न जाणारे तापमान आता सर्रास ४० पार जात आहे.

मृग नक्षत्र कोरडेच !

दरवर्षी ७ जूनला मृग नक्षत्र असते. तेव्हा झालेला पाऊस हा अतिशय चांगला असतो. पावसाळ्यातील हे पहिले नक्षत्र आहे. शेतकऱ्यांना या मृगाची आस लागलेली असते. या नक्षत्रात पाऊस झाला की, पेरण्या केल्या जातात. पण, यंदा ते कोरडेच जात आहे. आता सर्वांचे लक्ष २१ जून रोजीच्या आर्द्रा नक्षत्रावर आहे.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेmonsoon 2018मान्सून 2018