शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ ते ५ दिवस मॉन्सून सक्रिय राहणार; कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता

By नितीन चौधरी | Updated: June 16, 2025 17:01 IST

Maharashtra rain update तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकुच केली असून ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला आहे, दोन दिवसांत उर्वरित भागातही पोहोचणार

पुणे: अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मॉन्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसानंतर मॉन्सूनने आगेकुच केली आहे. सध्या मॉन्सूनने राज्याचा अमरावती व नागपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता ९५ टक्क्यांहून अधिक भूभाग व्यापला असून पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण राज्यात पसरणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते पाच दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. कोकणात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update) 

राज्यात मॉन्सूनने २५ मे रोजी धडक दिली. त्यानंतरच्या २४ तासांतच अर्थात २६ मे रोजी मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरीही लावली. मात्र, त्यानंतर प्रगतीसाठी आवश्यक असणारी स्थिती निवळल्याने मॉन्सून गेले २१ दिवस याच भागात रेंगाळलेला होता. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती असल्याने पावसाने उघडीप दिल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.

Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा

याबाबत भारतीय समाजशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले,“गुजरात किनारपट्टीवरील अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता वाढली असून पश्चिमेकडील वारे राज्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घेऊन येत आहेत. परिणामी मॉन्सून सक्रिय झाला आहे. यामुळे मॉन्सून सध्या संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, नैऋत्य मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि उपहिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीमच्या काही भागात पुढे सरकला आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून राज्याचा संपूर्ण भूभाग व्यापेल.”

दोन्ही समुद्रात तयार झालेल्या स्थितीमुळे पुढील तीन दिवसांत कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असून या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पावसाची तीव्रता मात्र कमी राहणार असून मॉन्सून मात्र सक्रिय राहणार आहे. विदर्भातील सर्च जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर १९ ते २२ जून या काळामध्ये विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मॉन्सूचा सध्याचा मुक्काम

मॉन्सूनची उत्तर सीमा सध्या वेरावल, भावनगर, वडोदरा, खरगोन, अमरावती, दुर्ग, बारगड, चांदबली, सँडहेड बेट, बालुरघाट या भागातून जाते. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये; विदर्भाच्या उर्वरित भागांमध्ये; छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे; पुढील २४ तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचे उर्वरित भाग आणि त्यानंतरच्या २ दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशचे काही भाग व्यापेल.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रweatherहवामान अंदाजNatureनिसर्गkonkanकोकणMumbai Rain Updateमुंबईचा पाऊस