Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:07 IST2023-08-03T13:22:00+5:302025-06-16T18:07:35+5:30

Mumbai Rains Live News Updates: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरतील विविध ठिकाणाचे पावसाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येतील.

mumbai rain live updates news in marathi | Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?

Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसारख्या २४ तास 'ऑन ड्युटी' शहरात पावसामुळे नेहमीच मुंबईकरांची कोंडी होते. मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना होतात. तसंच भुयारी मार्गही ठप्प होतात. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे शहराची वाहतूक, रेल्वे व्यवस्था विस्कळीत होऊन शहर ठप्प होते. दररोज लाखोंच्या संख्येनं चाकरमानी मुंबईत प्रवास करतात. पावसामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होऊ नये. यासाठी शहरतील विविध ठिकाणाचे पावसाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येतील...

Mumbai Rains LIVE UPDATES

LIVE

Get Latest Updates

16 Jun, 25 : 05:53 PM

मुंबईला उद्या दुपारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी...

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर आणि उपनगरसाठी उद्या दुपारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठी मोबाइल क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. 

16 Jun, 25 : 05:46 PM

किंग्स सर्कल परिसरात पाणीच पाणी...

16 Jun, 25 : 05:11 PM

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह परिसरात पावसाची काय परिस्थिती? पाहा...

मुंबईच्या समुद्राला उधाण आलं असून ४ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत...

16 Jun, 25 : 05:05 PM

लोकलसेवा सध्यातरी सुरळीत...

गेल्या तासाभरापासून मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. पण मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सध्यातरी सुरळीत सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लोकल सेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यात आहे. 

16 Jun, 25 : 04:51 PM

मुंबईच्या समुद्राला उधाण...

16 Jun, 25 : 04:43 PM

Mumbai Rain Update: पुढील ३ ते ४ तास मुंबईसाठी महत्त्वाचे...

मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील तीन ते चार तास अतिशय महत्त्वाचे असणार असून या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

16 Jun, 25 : 04:34 PM

अंधेरी सबवे पाण्याखाली...

मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये साचलं ३ ते ४ फूट पाणी, सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे 

16 Jun, 25 : 04:29 PM

मुंबई शहर-उपनगरात तुफान पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने गेल्या तासाभरापासून चांगलीच हजेरी लावली असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

26 May, 25 : 11:30 PM

मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपलं

मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले आहे. बेलापुरमधील पाणी अद्यापही ओसरलं नाही, बेलापूर सेक्टर ३ आणि ४ मध्ये पाणीच पाणी झाले. पाण्यामध्ये अनेक वाहन पडली बंद आहे तर पाण्यामध्ये बस देखील अडकली, पाण्यातमध्ये नवी मुंबई पालिकेची बस अडकल्याने प्रवाशी चालत निघाले आहेत.

26 May, 25 : 11:22 PM

विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान याठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष २५ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यातील दोघे सुखरूप असून, घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले व या झाडाला कापून आता साईडला करण्यात आले आहे.

मात्र, स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

26 May, 25 : 11:00 PM

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा

सोमवारी रात्री ११ वाजता समुद्रात ४.१ मीटर उंचीची भरती येईल. या काळात अंदाजे १३ फूट उंच लाटा उसळतील. जर मुसळधार पाऊस पडला तर मुंबईतील सखल भागात पाणी साचेल, जे मंगळवारी सकाळी मुंबईकरांसाठी आपत्तीचे कारण ठरेल.

26 May, 25 : 07:28 PM

उरण मधील कळंबूसरे गावाला मुसळधार पावसाचा तडखा

उरण मधील कळंबूसरे गावाला मुसळधार पावसाचा तडखा. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळंबूसरे गावातील 25 ते 30 घरांना मोठं नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे आणि कौले उडाली आहेत.

26 May, 25 : 06:41 PM

खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल

खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात हे ठिकाण नियमितपणे पाण्याखाली जात असल्याचे दिसून आले आहे. 

26 May, 25 : 06:41 PM

मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे गाडीवर झाड कोसळले

मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे गाडीवर झाड कोसळले. लोक थोडक्यात बचावले, मोठी दुर्घटना टळली  आहे, सीएसएमटी स्टेशनच्या आवारात पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती.

26 May, 25 : 06:16 PM

पालिकेची ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले. दादर, शिव, कुर्ला, मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान पाणी तुंबल्याने लोकलसेवा खोळंबली. दरम्यान मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( डीआरएम) यांच्या सोशल मीडिया वरून 'बीएमसी ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सांगण्यात आले.

26 May, 25 : 05:24 PM

चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट

मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाले आहेत. विद्युत वाहिनीवर झाड आल्याने त्याला देखील आग लागली आहे.

26 May, 25 : 04:21 PM

एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट

मुंबईत मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. 

26 May, 25 : 03:14 PM

माहीम येथे इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत तुफान पाऊस सुरू असून, माहीम येथील एका इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

26 May, 25 : 02:09 PM

मुंबईतील KEM रुग्णालयात पावसाचं पाणी साचल्याने रुग्णांचे नातेवाईत त्रस्त

26 May, 25 : 02:06 PM

मान्सून पूर्व पावसातच मुंबईची दैना, प्रभादेवी परिसरात साचलं पाणी

26 May, 25 : 01:30 PM

मुंबईसाठी २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. सहकार्य करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन...

26 May, 25 : 01:27 PM

परळ येथील रस्त्यांवर पाणीच पाणी

26 May, 25 : 01:23 PM

पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले आहेत. सायन, गांधी मार्केट, वडाळा, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हे मार्ग वळवण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.

गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाड्या सकाळी पावणे दहा वाजल्यापासून भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.

सायन रोड नंबर २४ वर पाणी भरल्यामुळे मार्ग क्रमांक ३४१ व ३१२ या अप दिशेतील बसगाड्या सायन मेन रोड चा सिग्नल येथून डावी कडे वळण घेऊन यु टर्न घेतील व पूर्ववत मार्गस्थ होतील.

वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक ११७ व १७४ च्या बस गाड्या नऊ वाजल्यापासून वडाळा चर्च मार्गे परावर्तित करण्यात आल्या आहेत.

26 May, 25 : 12:23 PM

मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला फटका, आचार्च अत्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी

26 May, 25 : 12:06 PM

मुसळधार पावसाचा मुंबईतील विमानसेवेवरही परिणाम

मुंबई आणि मुंबई उपनगरात सोमवार सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मध्य रेल्वेचे वाहतूकही ठप्प झाली आहे. दुसरीकडे मुंबईतील विमान उड्डाणांवरही पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

26 May, 25 : 11:56 AM

मुसळधार पावसाने रस्ते बंद; मुंबईत सध्या काय स्थिती?

26 May, 25 : 11:54 AM

मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

26 May, 25 : 11:51 AM

दादर, हिंदमाता भागात पाणी साचले, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची पायपीट

26 May, 25 : 11:38 AM

कुर्ला स्थानकांपर्यंतच मध्य रेल्वेची सेवा सुरू

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या भागातून येणाऱ्या लोकल सेवा कुर्ला स्थानकापर्यंत आणल्या जात आहेत. गेल्या तासाभरापासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प आहे.

26 May, 25 : 11:36 AM

मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

मस्जिद, माटुंगा या स्थानकांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील सेवा बंद करण्यात आली आहे. मस्जिद येथे अगदी प्लॅटफॉर्मपर्यंत पावसाचे पाणी आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

26 May, 25 : 11:33 AM

मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा कार्यरत

मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत. पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. तसेच, भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

26 May, 25 : 11:31 AM

मुंबई शहर, उपनगरात तुरळक ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

26 May, 25 : 11:29 AM

मुंबईला पावसाने झोडपले

सोमवार सकाळपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. सकाळपासून अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडत आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि लगतच्या परिसराला पावसाचे झोडपून काढले आहे.  

19 Jul, 24 : 10:17 AM

19 Jul, 24 : 10:07 AM

मुंबईच्या समुद्रात आज भरटी आणि ओहोटीची वेळ

19 Jul, 24 : 10:06 AM

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना झोडपलं

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाचा तडाखा बसला आहे. रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरात बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.  

19 Jul, 24 : 10:04 AM

मुंबईत रात्रभर मुसळधार

मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे उपनगरात सखल भागात पाणी साचलं आहे

08 Jul, 24 : 05:04 PM

३ तासांत अतिमुसळधार पावासाचा इशारा

पुढील ३ तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावासाचा इशारा

08 Jul, 24 : 04:26 PM

मरिन ड्राइव्हवरुन LIVE

08 Jul, 24 : 04:03 PM

कामावरुन घरी परतणाऱ्यांसाठी मोठा दिलासा

कुर्ला-सायन स्थानकादरम्यानचं पाणी ओसरलं, मध्य रेल्वेचे स्लो आणि फास्ट असे दोन्ही ट्रॅक पूर्ववत झाले आहेत. तर हार्बर रेल्वेची सीएसएमटी ते पनवेल वाहतूक देखील सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटं उशीराने सुरू आहे. 

08 Jul, 24 : 03:50 PM

मुंबईतील पावासाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वॉर रुममध्ये पोहोचले

08 Jul, 24 : 03:44 PM

अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परिणामी विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत..

08 Jul, 24 : 03:43 PM

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मरिन ड्राइव्ह, कुलाबा, ग्रँटरोड, चर्नीरोड परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. 

08 Jul, 24 : 03:42 PM

मुंबईत ६ तासांत ३०० मिमी पाऊस, कारण काय?

 

08 Jul, 24 : 03:40 PM

अंधेरी सबवेमधील पाणी अखेर ओसरले

 

08 Jul, 24 : 03:31 PM

सांताक्रूझच्या वाकोला येथे वाहनं पाण्याखाली

08 Jul, 24 : 03:28 PM

पुढील ३ तास महत्वाचे- हवामान खात्याचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरातील पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावासाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

08 Jul, 24 : 03:27 PM

मुंबईत पुन्हा पावासाचा जोर वाढला

रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने आज मुंबईत कहर केला. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली. तर लोकल सेवा देखील बाधित झाली होती. आता पुन्हा एकदा पावासाचा जोर वाढला आहे. 

29 May, 24 : 11:04 AM

मुंबई आणि परिसरात १० ते ११ जूनपासून पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

27 Sep, 23 : 05:12 PM

मुंबई उपनगरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी; वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी भागात तुफान पाऊस

08 Sep, 23 : 02:14 PM

वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी परिसरात तुफान पाऊस; अंधेरी सबवे पाणी भरल्याने वाहतुकीसाठी बंद

08 Sep, 23 : 02:05 PM

मुंबईला पुढील २४ तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट, गेल्या २४ तासांत मुंबईत सकाळी ८ वाजेपर्यंत १०० मीमी पावसाची नोंद

08 Sep, 23 : 01:57 PM

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे

03 Aug, 23 : 01:23 PM

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची दडी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती

Web Title: mumbai rain live updates news in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.