शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

माकड पळविणारा फरारच; नाव निष्पन्न

By admin | Updated: June 29, 2015 23:56 IST

महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातील माकड गाडीत घालून पळवून नेणारा दीपक ऊर्फ दादा घिसरे (रा भिवरी, ता. पुरंदर) या आरोपीचा शोध लावण्यात भोर पोलीस व वन विभागाला यश

भोर : महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातील माकड गाडीत घालून पळवून नेणारा दीपक ऊर्फ दादा घिसरे (रा भिवरी, ता. पुरंदर) या आरोपीचा शोध लावण्यात भोर पोलीस व वन विभागाला यश आले असून या चोरीतील गाडी जप्त करून भोर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. मात्र, माकड पळवणारा दीपक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे़याबाबत वन विभाग व भोर पोलिसांकडून मिळालेली महिती अशी कि २२ जूनला दीपक घिसार हा एम.एच.१२ जी. एफ या आय २० गाडीतून कोकणात फिरायला गेला असल्याचे समजते़ घाट चढुन वर आल्यावर त्या दरम्यान वरंध घाटातील वाघजाई मंदिरासमारेच्या संरक्षक भितीवर माकडे उभी असतात़ पर्यटक त्यांना खायला घालतात़ त्यामुळे ही माकडे त्यांच्यामागे लागतात़ दीपकने उभी असलेल्या माकडाच्या पिल्लाला खायला देण्याच्या बाहाण्याने उचलुन आपल्या गाडीच्या डिक्कीत टाकुन पळवून नेले़ यावेळी इतर माकडे गाडीच्या मागे धावत होती, याचे एका प्राणीमित्राने चित्रीकरण करुन ते सर्वत्र पाठवण्यात आल्यावर मोठया प्रमाणात चर्चा झाली आणी २३ जुनला वनविभागकडून भोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, विठठल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. झगडे, पोलीस जमादार नाना जेधे, रमेश साळुंके, वनपाल शेक यांनी सलग चार दिवस कात्रज पुणे येथील वंडरशिटी, सासवड येथे तपास करुन दीपक घिसार याचा शोध लावला असता या चोरीतील गाडी भिवरी ता.पुरंधर येथील एका धाब्यावर सापडली़ गाडीचा नंबर खोडण्याचा प्रयत्न केला असुन गाडीच्या मागे आपली माणस असे लिहिलेले आहे.