शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

खुनाची सुपारी देणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकावर ‘मोक्का’ कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

पुणे : पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलू गवळीच्या खुनाची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व त्याच्या साथीदारांवर पुणे ...

पुणे : पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलू गवळीच्या खुनाची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व त्याच्या साथीदारांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.

विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोंमेंटचा माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक आहे. बबलू गवळी याने २०१६ च्या गणशोत्सव विसर्जन मिरवणुकीत यादव याच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या साथीदारांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ७ काडतुसे, रोकड जप्त केली होती. राजन याच्याकडील मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅपच्या संभाषणावरून यादव याने बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यासाठीच त्याने ही शस्त्रे पुरवल्याचे उघड झाले. राजमणी याला अटक केल्याचे समजल्यावर यादव फरार झाला होता. त्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात-राजस्थान बॉर्डरवर अटक केली होती.

यादव याने साथीदारांबरोबर मिळून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. टोळी प्रमुख विवेक यादव याने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या सहकार्याने मोक्का प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. चव्हाण यांनी प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे अधिक तपास करीत आहेत.