Pune | आळेफाटामध्ये मोबाइल दुकानात चोरी; 12 लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:56 IST2022-12-05T14:55:05+5:302022-12-05T14:56:18+5:30

पहाटे घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

Mobile shop theft in Alephata cost of 12 lakhs mobile phone pune latest crime news | Pune | आळेफाटामध्ये मोबाइल दुकानात चोरी; 12 लाखांचा ऐवज लंपास

Pune | आळेफाटामध्ये मोबाइल दुकानात चोरी; 12 लाखांचा ऐवज लंपास

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा येथील ऐन चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेली मोबाइलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. विविध कंपनीचे तब्बल 12 लाखांच्यावर मोबाइल लंपास केल्याची घटना सोमवार (दि. 5) रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

आळेफाटा परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडून चाळीस हजार रूपयांच्यावर मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज पहाटे घडलेल्या या घटनेने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन गुगळे यांची आळेफाटा चौकापासून जवळच कल्याण नगर महामार्गावरवरील त्रिमूर्ती प्लाझा या बिल्डिंगमध्ये कोहिनूर मोबाईल शॉपी आहे. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानात ठेवण्यात आलेले विविध कंपन्यांचे सुमारे 100 च्या वर मोबाईल व सीसीटीव्ही कॅमेरा असा 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल लंपास केला. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Mobile shop theft in Alephata cost of 12 lakhs mobile phone pune latest crime news