किरकोळ कारणावरून मित्राचा केला खून

By Admin | Updated: May 25, 2015 05:42 IST2015-05-25T05:42:50+5:302015-05-25T05:42:50+5:30

कुऱ्हाड व्यवस्थित बनवून दिली नाही,या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले व त्यातून २ जणांनी एकास लोखंडी गजाच्या

Mitra's murder on retail grounds | किरकोळ कारणावरून मित्राचा केला खून

किरकोळ कारणावरून मित्राचा केला खून

लोणी काळभोर : कुऱ्हाड व्यवस्थित बनवून दिली नाही,या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले व त्यातून २ जणांनी एकास लोखंडी गजाच्या साह्याने ठार मारले. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या तासाच्या आत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले.
या प्रकरणी मयताचे वडील सुरेश हरीभाऊ साळुंखे (वय ४० वर्षे, रा. सिद्राममळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर. मूळ रा. कऱ्हा वाघज, ता. बारामती.) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. नागेश्वर सुरेश साळुंखे
(वय १८ वर्षे) या तरुणाचा खून झाला असून भानूदास हनुमंत लिंगे (वय २२ वर्षे) व संजय मुखहरी चव्हाण (वय ३० वर्षे, दोघे रा. सिद्र्राममळा, नांदेपाटील वस्ती, लोणी काळभोर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
साळुंखे कुटुंबाचा घिसाडी
काम करण्याचा व्यवसाय असून
काही दिवसांपूर्वी लिंगे याने नागेश्वरकडे एक कुऱ्हाड तयार करण्यासाठी
दिली होती. ती व्यवस्थित तयार करून न दिल्याने लिंगे नागेश्वरवर
नाराज होता. शनिवार २३ मे रोजी नागेश्वर, लिंगे व चव्हाण या मित्रांनी अतिमद्यपान केले. दारू पिऊन झाल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणांवरून चव्हाण व नागेश्वर या दोघांची बाचाबाची झाली.
याचवेळी लिंगे याने कुऱ्हाडीचा विषय काढला. तिघांचा वाद वाढल्यानंतर लिंगे याने दुचाकीला अडकवलेला गज काढला व तो नागेश्वरच्या डाव्या कानाच्या मागील बाजूस व कपाळावर मारला. वर्मी घाव बसल्याने नागेश्वर खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत सोडून दोघे घरी निघून गेले. आज सकाळी हा प्रकार समजल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथक घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना नागेश्वर मृतावस्थेत आढळून आला. चौकशी केली असता नागेश्वर सोबत भानूदास लिंगे व संजय चव्हाण असल्याची माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर खून आपणच केला असल्याची त्यांनी कबुली दिली.
एक तासाच्या आत खुन्यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथकाचे कौतुक करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Mitra's murder on retail grounds