शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 5:52 PM

पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे. 

पुणे : पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगडपोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष वसंत शेलार हा कासेवाडी झोपडपट्टी, भवानीपेठ भागात वास्तव्यास होता. तो नोव्हेंबर २०१०पासून बेपत्ता असून जानेवारी २०११मध्ये त्या संबंधीची तक्रार खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तो विश्वा नावाने ओळखला जातो. छत्तीसगड पोलिसांनी कार्यरत असणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत विश्वा हा राजनंदगावामधील तांडा विभागातील माओ कमिटीचा डेप्युटी कमांडर असल्याचे म्हटले आहे.२५ मार्च २०१९ या दिवशी बनवण्यात आलेल्या या यादीत पुण्यातील २८वर्षीय विश्वाच्या नावासह छायाचित्रही सामील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांडा विभागात १४ व्यक्तींचा समावेश असून विश्वा याचा क्रमांक चौथा आहे. शिवाय त्याच्याकडे ३०३ क्रमांकाची रायफलही आहे. 

त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये त्याने इयत्ता ९वी नंतर शाळा सोडल्याचे समजते. तो त्याच्या चित्रकलेसाठी ओळखला जात होता. त्याने पुण्यातील कबीर मंचामध्ये सहभाग नोंदवल्याचे समजते. मुंबईला प्रदर्शनाच्या कामासाठी जाण्याचे कारण सांगून तो बाहेर पडला आणि गायब झाला असे त्याच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

याशिवाय त्याच्यासोबत गायब झालेल्या पुण्यातील अजून एका युवकही माओ गटात सहभागी झाल्याचे समजते. प्रशांत कांबळे हा पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील झोपडपट्टी भागात राहणारा युवक शेलारसोबत बेपत्ता झाला होता. २०११ साली महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने कबीर कला मंचच्या काही सभासदांना अटक केली होती. यावेळी कांबळे व शेलार फरार झाले होते. 

मुलाची आठवण येते पण कुठे आहे माहिती नाही 

याबाबत संतोषचे ६५वर्षांचे वडील वसंत शेलार म्हणतात की, तो लहानपणापासून अतिशय प्रेमळ मुलगा होता. अगदी सुरुवातीपासून त्याला चित्रकलेत रस होता. मुलाची आठवण येते पण तो कुठे आहे याची माहिती नाही. या बाबतीत पोलीस किंवा कोणत्याही व्यक्तीने संपर्क केलेला नाही.             

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस