पुण्यात मार्केटयार्ड येथून तरुणी बेपत्ता; दोन दिवसांनी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 21:35 IST2021-09-22T21:35:21+5:302021-09-22T21:35:49+5:30

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती.

Missing girl from marketyard in Pune; Two days later the body was found on the railway tracks | पुण्यात मार्केटयार्ड येथून तरुणी बेपत्ता; दोन दिवसांनी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

पुण्यात मार्केटयार्ड येथून तरुणी बेपत्ता; दोन दिवसांनी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

ठळक मुद्देघरातून गेल्यानंतर ती रेल्वे रुळापर्यंत कशी पोहचली याचा तपास सुरु

पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर वसाहतीून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हडपसर येथील रेल्वे रुळावर आढळून आला आहे. प्रतिमा भास्कर कुटगे (वय २२, रा. आंबेडकरनगर) असे या तरुणीचे नाव आहे.

प्रतिमा कुटगे ही सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशीरापर्यंत वाट पाहून देखील ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी इतर ठिकाणी चौकशी केली मात्र तीचा पत्ता लागला नाही. शेवटी नातेवाईकांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात रात्री उशीरा धाव घेत प्रतिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

त्यानुसार मार्केटयार्ड पोलिस तिचा शोध घेत होते. परंतू संबंधीत वर्णणाची एक तरुणी हडपसर येथील रेल्वे रुळावर मृत अवस्थेत मिळून आली. त्यांनी याची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना दिली होती. खात्री केली असता ती तरुणी प्रतिमा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला. अधिक चौकशीसाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. प्रतिमा घरातून गेल्यानंतर ती रेल्वे रुळापर्यंत कशी पोहचली. तिच्यासोबत कोणी होते का? याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Missing girl from marketyard in Pune; Two days later the body was found on the railway tracks