अल्पवयीन मुलीला २ वेळा उंदीर मारण्याचे औषध देऊन केला खून; एकवीस वर्षीय युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:54 IST2022-11-24T20:54:23+5:302022-11-24T20:54:42+5:30
तरुणाचे अल्पवयीन मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते

अल्पवयीन मुलीला २ वेळा उंदीर मारण्याचे औषध देऊन केला खून; एकवीस वर्षीय युवकाला अटक
घोडेगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने लग्नाचा तगादा लावताच तिला जबरदस्तीने विष पाजून खून केल्याची तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २१ वर्षीय मुलाचे त्याच्या गावापासून जवळच असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिला त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी मुलीने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. परंतु त्याने त्याने ती मागणी फेटाळली. इतकच नाही तर कोणतेही कारण सांगून टाळाटाळ करू लागला. दरम्यान, युवकाने मुलींचा कायमचाच काटा काढण्यासाठी घोडेगाव येथील एका दुकानातून उंदीर मारण्याचे औषध आणले. त्यानंतर १३ नोव्हेंबरला तळेघर येथील हॉटेलमधून पेढा घेतला. त्यात उंदीर मारण्याचे औषध मिसळले व मुलीला घराबाहेर शेतात बोलवले अन् तो पेढा तिला खाऊ घातला. त्या औषधाचा तिच्यावर परिणाम होत नाही, ती मरत नाही असं पाहून त्याने तिला पुण्याला पळून नेले व नातेवाईकांकडे ठेवले. तेथे असताना तिला उलट्या झाल्या. त्यावेळी त्याने तेथील स्थानिक दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधे त्याने तिला दिल्या नाहीत. १९ नोव्हेंबर रोजी तिने पाणी मागितले असता युवकाने तिला उंदराचे औषध घातलेला पेढा परत दिले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, हे मुलीच्या मृत्यू झाल्याचे समोर आले असता त्याने पीडितेने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला. मात्र, हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. अधिक तपास घोडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलिस हवालदार मनिषा तुरे करत आहेत.