शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ओतूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: September 15, 2016 01:43 IST

येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली

ओतूर : येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शरद लोखंडे यांनी दिली.याबाबत चेतन नरेंद्र नंदनवार (वय २३), गणेश शिवाजी बावस्कर (वय २२), शंकर शिवाजी लोहोकरे (वय २२) व स्वप्निल भास्कर फाले (वय २२, सर्व रा. ओतूर) यांना सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. सदर पीडित अल्पवयीन मुलीवर अरोपी चेतन नंदनवार व गणेश बावस्कर यांनी ओळखीचा गैरफायदा घेऊन जुलै २०१६मध्ये माडवी नदीच्या किनारी असलेल्या एका कपारीमध्ये नेऊन बलात्कार केला. हे चेतन व गणेशचे मित्र शंकर शिवाजी लोहोकरे व स्वप्निल भास्कर फाले यांना समजले. याचाच गैरफायदा घेऊन शंकर व स्वप्निल यांनी ‘तू काय करतेस, आम्हाला माहिती आहे’ असे म्हणून दि. ११ आॅगस्ट रोजी स्वप्निलच्या राहत्या घरात तिला नेले व घराची कडी लावून बलात्कार केला. तीन महिन्यांपासून सदर पीडित मुलीवर चारही आरोपी धमकी देऊन अत्याचार करीत होते. ही बाब पीडित मुलीच्या नातलगांना समजली. यानंतर पीडित मुलगी व तिच्या नातलगांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (२) (क ) (ठ) (ड), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२चे कलम ४, ६, ८, १० अन्वये गुन्हा नोंदवून अरोपींना अटक केली आहे. (वार्ताहर)