'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:21 AM2024-01-03T11:21:52+5:302024-01-03T11:24:38+5:30

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे.

Minister Chhagan Bhujbal demanded 'Community census in the state in two months' | 'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : पुणे- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करत सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू केला आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारकडे दोन महिन्यात जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. 

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

"ओबीसी समाजासाठी काम करण्याचे मला वेड लागले आहे. तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा, दोन दिवसात करा किंवा १५ दिवसात करा. तुम्ही ५० टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करमार मग सगळ्यांचे करा. मला आनंद आहे करा तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातीची जातीय जनगणना करा, अशी मागणी मंत्री थगन भुजबळ यांनी केली. 

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद असल्याचे बोलले जात होते. आधी भुजबळ यांनी समसमान जागा वाटपाची मागमी केली होती, तेव्हा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना जागावाटपाबाबत उघड न बोलण्याचा इशारा दिला होता, यावर बोलताना भुजबळ म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाद नाही. तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून ठरवतील. जितकी ताकद असेल तसे जागा वाटप होईल, असंही भुजबळ म्हणाले. 

" नरेंद्र मोदी यांचे वारे सगळीकडे आहे, तेच निवडून येतील. महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आथा आमचाच महायुतीचा मुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे आहेत, ते आमचेच आहेत,असंही भुजबळ म्हणाले.   

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार

१४ जानेवारीपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही राज्यभरात दौरे करतोय. ५० हजार नागरिकांच्या मतदानाचा विचार केला तर २०२४ मध्ये पंतप्रधान कोण हवेत तर ४७ हजार ४१२ लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत असं म्हटलं. मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बळ, या राज्यातील संपूर्ण समाज मोदींच्या नेतृत्वाखाली भारत निर्माण होण्यासाठी पाठिशी उभा आहे. जसजसं मोदींच्या नावाचं वादळ महाराष्ट्रात येईल तसतसं महायुतीच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी निमंत्रण येत आहेत. महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं त्यांनी सांगितले.

Read in English

Web Title: Minister Chhagan Bhujbal demanded 'Community census in the state in two months'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.