शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:04 PM

चौकशी दरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत.

ठळक मुद्दे १० जानेवारी रोजी एकबोटे यांची साक्ष नोंदवली जाणार होती.

पुणे : समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी त्यांच्या वकीलांमार्फेत आयोगाला शुक्रवारी लेखी अर्ज सादर करुन साक्षीकरिता गैरहजर राहण्याची मागणी केली आहे. आयोगाने सदर अर्ज मान्य केल्याची माहिती आयोगाचे वकील अशिष सातपुते यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सदस्य माजी मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांचे समोर १० जानेवारी रोजी एकबोटे यांची साक्ष नोंदवली जाणार होती. एकबोटे यांनी आयोगाला सादर केलेल्या अर्जात सांगितले, एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली.या घटनेच्या अनुषंगाने माझे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केले. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आपल्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आणि अटक झाली. मात्र, चौकशी दरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत. पुणे न्यायालयाने याप्रकरणात मला जामीन मंजूर केलेला असून अद्याप यासंर्दभातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले नाही. एल्गार परिषदेचे आयोजक यांनी डाव्या संघटनेच्या मदतीने तसेच नक्षलवादी संघटना यांचे द्वारे जाणीवपूर्वक एक ते तीन जानेवारी २०१८ दरम्यान कोरेगाव भीमा, वढू व राज्यात आंदोलन पेटवले. आतापर्यंत या केसचा तपास पोलीस पारदर्शकपणे करत होते व त्यांनी नक्षलवादी संबंध उघडकीस आणल्याचे एकबोटे यांनी अर्जात म्हटले आहे.  

टॅग्स :PuneपुणेMilind Ekboteमिलिंद एकबोटेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार