शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा अहवाल पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांना देणार

By admin | Updated: April 14, 2015 01:39 IST

वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल,

पुणे : वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ची पहिली बैठकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे सांगितले.विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी बापट यांनी पत्रकार परिषद आयोजिली होती. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाबाबत स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप असल्यामुळे या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, दिल्ली मेट्रोचे जनक ई. श्रीधरन, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे (डीएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगो सिंह, उद्योगपती अभय फिरोदिया, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांच्यासमवेत राव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीच्या यापूर्वी काही बैठका झाल्या असून महिन्याच्या आत समितीला त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. या समितीची अंतिम बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. याबाबत बापट म्हणाले, ‘‘येत्या चार-पाच दिवसांत समितीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. परंतु अहवालाचा तपशील सांगण्यास बापट यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांनी अहवालाला मान्यता दिल्यानंतर हा अहवाल पुन्हा केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून रखडलेल्या पीएमआरडीएची स्थापनाही करण्यात आली आहे. सर्व शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला असून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी घटनेत बदल करावा लागणार आहे. पीएमआरडीएची समिती स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीची पहिली बैठकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.