शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:25 IST

गेला आठवडाभर पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली.

मुंबई/पुणे: कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून, पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणीयोग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

गेला आठवडाभर पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली. हवामान विभागाने हा पाऊस मान्सूनचा असल्याचे म्हटले तर तज्ज्ञांनी पूर्वमोसमी असल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुढील पाच दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

आता राज्यात पावसाचा प्रवास कसा? 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, मान्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही कमी होईल.

राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकणवगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. कोकणात दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.

लगेच पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका 

राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असताना लगेच पेरण्या कराव्यात की नाहीत याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना आता कृषी खात्याने लगेच पेरण्या न करण्याचा सल्ला दिला आहे.

कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले की, पेरणीसाठी जमिनीमध्ये जितकी ओल असणे आवश्यक असते त्यापेक्षा कितीतरी जास्त ओल अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पेरणी करतानादेखील अनेक अडचणी येतील. मातीचे लगेच गोळे होत असल्याने बीजरोपण योग्य पद्धतीने होणार नाही.

असे असूनही पेरणी केली आणि नंतर आठ-दहा दिवसांपेक्षा अधिक उघडीप राहिली तर पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक असेल, अशावेळी दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही. काळ्या, मध्यम वा हलक्या शेतजमिनीवरही लगेच पेरणी करण्याची घाई करू नये. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी