फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास; उभारलेल्या त्याच इमारतीतून ज्येष्ठाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:38 IST2026-02-23T13:38:01+5:302026-02-23T13:38:18+5:30

सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ व्यक्ती मुलासह अंबरनाथ इस्ट येथे राहत होते, त्यांनी बाणेर येथील जागा स्वीटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती

Mental distress due to fraud without giving a flat Senior citizen takes extreme step from the same building he built | फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास; उभारलेल्या त्याच इमारतीतून ज्येष्ठाने उचलले टोकाचे पाऊल

फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास; उभारलेल्या त्याच इमारतीतून ज्येष्ठाने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : बाणेर येथील विकसित करण्यासाठी दिलेल्या जागेत करारानुसार मिळकतीत फ्लॅट देतो, असे सांगूनही फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास दिल्याने त्याच जागेवरील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ इस्ट, जि. ठाणे), असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. ही घटना बालेवाडी बाणेर येथील मोझे कॉलेज बालेवाडी येथील सर्व्हे नंबर २४/१/१अ येथे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत महाजन यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (४१, रा. अंबरनाथ इस्ट, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी स्वीटी असोसिएटसचे जयंतीलाल ताराचंद ओसवाल (५६) आणि रिषभ ओसवाल (३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती. सेवानिवृत्तीनंतर ते मुलासह अंबरनाथ इस्ट येथे राहत होते. त्यांनी बाणेर येथील जागा स्वीटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. फिर्यादी यांच्या जागेवर मान्य केलेल्या करारानुसार अटी व शर्तीनुसार ओसवाल यांनी या मिळकतीमध्ये फ्लॅट देतो, असे सांगितले. तरीही कराराचे पालन न करता फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. त्यांना मानसिक त्रास दिला. नरेश महाजन यांच्या जागेवर सात मजली इमारत उभी राहिली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आतील कामे सुरू आहेत. नरेश महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी येथे आले होते. त्यांनी कराराप्रमाणे फ्लॅट देण्याविषयी ओसवाल यांच्याशी चर्चा केली; परंतु त्यांनी नरेश महाजन यांना मानसिक त्रास देऊन धमकावले. त्यांच्या त्रासाला कंटाळून ते इमारतीच्या ७ व्या मजल्यावर गेले. तेथून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. बाणेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.

Web Title : फ्लैट न मिलने पर वरिष्ठ नागरिक ने निर्माणाधीन साइट पर जान दी

Web Summary : पुणे में एक सेवानिवृत्त अधिकारी ने कथित तौर पर एक फ्लैट के सौदे में धोखा होने के बाद आत्महत्या कर ली। बिल्डरों द्वारा समझौते का सम्मान न करने और मानसिक रूप से प्रताड़ित करने पर उन्होंने निर्माणाधीन इमारत से कूदकर जान दे दी। पुलिस ने बिल्डरों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया है।

Web Title : Cheated of Flat, Senior Citizen Ends Life at Construction Site

Web Summary : A retired official in Pune committed suicide after being allegedly cheated out of a flat promised in a development deal. Facing mental harassment from builders who failed to honor the agreement, he jumped from the building site. Police have registered a case against the builders for abetment of suicide.