शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:59 IST

भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली.

मुंबई: भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केली. गत २३ जून रोजी महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणवेशात असताना भाजपचे पुणे शहर महासचिव प्रमोद कोंधारे यांनी विनयभंग केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसली. अस्वस्थ निरीक्षकांनी धैर्याने फारसखाना पोलिस ठाण्यात कोंधारे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. कोंधारेवर यापूर्वी विनयभंग, खंडणी, मारहाण, दंगलसह ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी कोंढारेला अद्यापही अटक केलेली नाही.

गुन्हा दाखल केल्याने आरोपी किंवा इतर त्रास देतील, म्हणून स्वेच्छेने बदली घेण्याचा वरिष्ठांचा प्रस्ताव निरीक्षकांनी ठामपणे नाकारला. गुन्हा दाखल करण्याचा निर्णय स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण महिला पोलिसांच्या सन्मानासाठी घेतला होता. बदलीने महिला पोलिसांचे मनोबल खच्ची होईल, असे त्यांनी  कळवले. तथापि २१ जुलैला त्यांची वाहतूक विभागात बदली केली. 

सरकारी वकिलांकडून युक्तिवाद
दरम्यान, गणेशोत्सवाच्या गर्दीत गैरसोयी टाळण्यासाठी प्रशासकीय कारणांनी बदली करण्यात आली. बदलीचा विनयभंगाच्या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मॅट मध्ये केला. त्याच्या विरुद्धच्या कसुरी अहवालामुळे बदली मंडळाने निर्णय घेतल्याचे सांगितले.

मॅटचे निरीक्षण काय ?  
१९ जुलै २०२५ रोजीच्या कसुरी अहवालात २१ जुलै २०२५ चा उल्लेख आहे यावरून तो मागाहून तयार केलेला आहे. एकाच दिवशी अहवाल, बदली मंडळाची बैठक व  बदलीचे आदेश म्हणजे अनावश्यक घाई आहे. बदली प्रशासकीय नसून दंडात्मक आणि द्वेषपूर्ण आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे