पतीच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:52 IST2020-04-30T17:51:26+5:302020-04-30T17:52:04+5:30

लग्नानंतर काही दिवसांमध्येच आरोपीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात केली.

Married women commited sucide due to her husband's harasshment | पतीच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

पतीच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

पुणे: पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नाझीया रईस खान (वय 30, रा. भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) भवानी पेठ परिसरात घडली. 
याप्रकरणी खडक पोलिसांनी पती रईस आयुब खान (वय 34) याला अटक केली आहे. याबाबत नाझियाची आई  रेहाना शेख (वय 59, रा. नेहरूनगर, सांताक्रुज) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिया व रईस यांचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर दोघेही पुण्यात भवानी पेठ परिसरात राहत होते. लग्नानंतर काही दिवसांमध्येच आरोपीने नाझिया यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात केली. तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून नाझिया हिने बुधवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर खडक पोलिसांनी खान याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस. बी. सावंत हे अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Married women commited sucide due to her husband's harasshment