Pune: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आठव्या मजल्यावरुन घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:14 IST2022-01-13T21:14:02+5:302022-01-13T21:14:29+5:30
लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरुन सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली

Pune: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आठव्या मजल्यावरुन घेतली उडी
पुणे : लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरुन सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.
कल्याणी प्रधान (वय ३२) असे या विवाहितेचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी अजितकुमार अनंतचरण प्रधान, पदमावती प्रधान, अनंतचरण प्रधान, अभिमन्यु प्रधान, ममता प्रधान (सर्व रा. ड्रीम्स आकृती सोसायटी, काळेपडळ, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाबन किशोरचंद परिडा (वय ४२, रा. ओडीसा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितकुमार याच्यासमवेत फिर्यादी यांची बहिण कल्याणी हिचा जून २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले आहेत. ते वजन वाढवून आणण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून त्या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. तसेच बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी होत होती. हा जाच असहय झाल्याने कल्याणी हिने ११ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ८ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक वाडकर अधिक तपास करीत आहेत.