लग्नाला नकार; विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तरुण फरार, जंगलात आढळला मृतदेह, जुन्नरमध्ये घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:57 IST2026-03-13T15:55:39+5:302026-03-13T15:57:12+5:30

पोलिसांच्या तपासात गणेशखिंडमधील गणपती मंदिर लगतच्या दरीतील जंगलात त्याची दुचाकी आणि मृतदेह आढळून आला

Marriage refused; Young man attacks student with a coyote and flees, body found in forest, incident creates stir in Junnar | लग्नाला नकार; विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तरुण फरार, जंगलात आढळला मृतदेह, जुन्नरमध्ये घटनेने खळबळ

लग्नाला नकार; विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तरुण फरार, जंगलात आढळला मृतदेह, जुन्नरमध्ये घटनेने खळबळ

जुन्नर : शासकीय मुलींच्या वसतिगृहानजीक अठरा वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार करत तिला गंभीर जखमी करून फरारी झालेल्या महेश डामसे याने गणेशखिंडमधील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवार (दि. १२) रोजी पोलिस तपासामध्ये उघडकीस आले.

महेश याने बुधवार (दि. ११) रोजी तरुणीवर कोयत्याने वार केले होते. या घटनेनंतर तो दुचाकीवरून फरार झाला होता. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होते. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, महादेव शेलार, दीपक साबळे, संदीप वारे यांनी जुन्नरपासून गणेशखिंडपर्यंत सीसीटीव्हीची तपासणी केली असता गणेशखिंड परिसरात महेश आल्याचे स्पष्ट झाले. अधिक शोध घेत असताना गणेशखिंडमधील गणपती मंदिर लगतच्या दरीतील जंगलात त्याची दुचाकी मिळून आली. तेथून काही अंतरावर एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. त्याने बुधवारीच आत्महत्या केली असावी, अशी शक्यता या पथकाने व्यक्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली असता तिच्या मूळ गावचा असणारा युवक महेश मुरलीधर डामसे या युवकाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल. जखमी विद्यार्थी व आरोपी दोघेही एकाच गावातील रहिवाशी असून लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने सदर हल्ला केल्याचा जबाब जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिला आहे. जुन्नर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती.

Web Title : विवाह प्रस्ताव अस्वीकार: हमलावर जुन्नर के जंगल में मृत पाया गया

Web Summary : एक युवती ने विवाह प्रस्ताव अस्वीकार कर दिया जिसके बाद उस पर दरांती से हमला किया गया। हमलावर फरार हो गया और बाद में जुन्नर के पास एक जंगल में आत्महत्या करके मृत पाया गया। पुलिस अपराध और आत्महत्या की जांच कर रही है।

Web Title : Rejection Leads to Attack; Assailant Found Dead in Junnar Forest

Web Summary : A young woman was attacked with a sickle after rejecting a marriage proposal. The attacker fled and was later found dead by suicide in a forest near Junnar. Police are investigating the crime and the suicide.