शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Gudhi Padwa 2026: मराठी नववर्षास गुढीपाडव्यापासून सुरुवात; सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:43 IST

गुढी उभारण्यासाठी मुहूर्त नसला, तरी सकाळी लवकर गुढी उभारणे इष्ट ठरेल असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले आहे

पुणे: मराठी नववर्षास गुरुवारी (दि.१९) गुढीपाडव्यापासून सुरुवात हाेत असून, घरोघरी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी, असे आवाहन ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी केले आहे. गुढी उभारण्यासाठी मुहूर्त नसला, तरी सकाळी लवकर गुढी उभारणे इष्ट ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

नवीन शके १९४८ या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढी उभारून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून, संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करावी, असे मोहन दाते यांनी सांगितले.

अशी उभारावी गुढी

- गुढीपूजनाकरिता वेगळा असा विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे, याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल ते सर्व करता येते.- गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत, ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.- गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी.- जिथे गुढी उभी करावयाची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.- ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते.- ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी. ‘ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद । प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।।’ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे.- त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे.- सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.- गुरुवार १९ मार्च रोजी गुढीपाडव्यापासून शके १९४८ या नवीन वर्षाची सुरुवात अमावास्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर होत आहे.- या वर्षी १७ मे ते १५ जून या कालावधीत ज्येष्ठ अधिकमास येत आहे.- यंदा ५ मे आणि २९ सप्टेंबर असे दोन अंगारक चतुर्थी योग येत आहेत. तसेच, पाच गुरुपुष्यामृत योग अनुक्रमे २३ एप्रिल, २१ मे, १८ जून, १८ फेब्रुवारी (२०२६) आणि १८ मार्च या दिवशी आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gudhi Padwa 2026: Marathi New Year begins; hoist Gudhi after 6:54 AM!

Web Summary : Marathi New Year starts on Gudhi Padwa. Hoist the Gudhi after 6:54 AM. New Samvatsara is 'Parabhav'. Worship the Panchang. Offer prayers, observe customs, and enjoy neem water. Two Angarak Chaturthi and five Guru Pushyamrut yogas this year.
टॅग्स :Puneपुणेgudhi padwaगुढीपाडवाcultureसांस्कृतिकFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिक