शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांच्या मागण्यांसाठी मराठा मोर्चा; बैठकीत निर्वाळा

By admin | Updated: September 14, 2016 00:59 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून

जेजुरी : छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून, गावगाड्यातील अठरापगड जातींना बरोबर घेऊन वाटचाल करणारा मराठा समाज सध्याच्या काळात मागे पडला आहे, अशी विविध मते मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडत आता अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.येत्या २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जेजुरी येथील छत्रीमंदिर येथे सोमवारी (दि. १२) शहर पंचक्रोशी व ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा समाजातील वकील, इंजिनिअर, उद्योजक, व्यापारी व्यावसायिक, प्राध्यापक, शेतकरी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषत: युवकवर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपर्डी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. मराठा समाजाचा लढा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून न्याय्य आणि हक्कांच्या मागणीसाठी आणि संघटित होण्यासाठी आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या १०० पैकी ९० केसेस खोट्या आहेत, असे मत बैठकीत व्यक्त झाले.सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांना कर्जमाफी मिळावी, अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील युवकांना आरक्षण नसल्याने तो बेरोजगार होत आहे. आरक्षण मिळण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. समाजाला सध्या कोणी वाली नाही. सत्तेत आपले लोक असूनही काही घटक आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल राहिल्याची खंत आहे अशी विविध मते व मागण्या उपस्थितांनी मांडल्या. २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मूक मोर्चात सहभागी होण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना या वेळी करण्यात आल्या. कोपर्डी घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)