येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 05:00 PM2018-09-01T17:00:07+5:302018-09-01T17:03:03+5:30

येरवडा कारागृहाच्या बाहेर टवाळ तरुण गर्दी करत असल्याने कारागृहाच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे.

many supporters of accused are gathering in front of yerawda jail | येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी

येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी

Next

पुणे :  अापले भाई, दादा जामीनावर सुटल्यानंतर किंवा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पाेलिस त्यांना येरवडा कारागृहात अाणत असताना त्यांचे कार्यकर्ते कारागृहाच्या बाहेर गर्दी करत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे कारागृहाच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे. 

     महिन्याभरापूर्वी अापल्या घरुन कारागृहात जात असताना एका तुरुंग अधिकाऱ्यावर दाेन अाराेपींनी गाेळीबार केला हाेता. तुरुंग अधिकारी कारागृहात शिस्तीचे पालन करण्यासाठी सांगत असल्याने जामिनावर सुटलेल्या अाराेपीने हा गाेळीबार केला हाेता. या गाेळीबारात सुदैवाने त्या अधिकाऱ्याला कुठलिही इजा झाली नव्हती. या घटनेनंतर अधिकाऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला हाेता. या घटनेनंतर सर्व अधिकाऱ्यांना स्वतःच्या रक्षणासाठी बंदुक साेबत ठेवण्याची परवानगी कारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांनी दिली अाहे. कारागृहात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगार अाहेत. त्याचबराेबर अनेक दहशतवादी, नक्षलवादी हे सुद्दा याच कारागृहात शिक्षा भाेगत अाहेत. सध्या कारागृहात साडेपाच हजारांहून अधिक कैदी अाहेत. तर केवळ दाेन हजार चारशे एकाेणपन्नास इतकी कारागृहाची क्षमता अाहे. दिवसाला 50 एक नवीन कैद्यांची भर पडत असते. त्या तुलनेत बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प अाहे. 

    पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये टाेळक्यांनी अापली डाेकी वर काढली हाेती. विविध भागात या टाेळक्यांची दहशत हाेती. यातील अनेक गुन्हेगारांना पाेलिसांनी अटक केली असून अनेकजण येरवडा कारागृहात अाहेत. जेव्हा कारागृहाचे अधिकारी या अाराेपींना काेर्टात हजर करत असतात, किंवा शिक्षा सुनावल्यानंतर काेर्टातून कारागृहात नेत असतात तेव्हा या अाराेपींचे साथीदार माेठी गर्दी कारागृहाच्या बाहेर करत असतात. त्याचबराेबर कैद्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही बरीच असते. अाराेपींचे साथीदार हे खूप वेळ कारागृहाच्या बाहेर थांबलेले असतात. त्याचबराेबर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे कामही करत असतात. कारागृहाचे अधिकारी कैद्यांना कारागृहात असताना शिस्तीचे पालन करण्यास लावतात. त्याचा राग अनेक अाराेपींना येताे. ताे अाराेपी जामीनावर सुटल्यावर अापल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर येत दहशत पसरविण्याचे काम करत असतात. कारागृहाच्या प्रवेशद्वारासमाेर वाहने लावण्यास तसेच थांबण्यास मज्जाव असतानाही तेथे वाहने घेऊन टवाळ तरुण थांबलेले असतात. त्यामुळे या टवाळखाेरांवर कारवाई करणे अावश्यक असल्याचे कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: many supporters of accused are gathering in front of yerawda jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.