PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच

By ओमकार संकपाळ | Published: May 22, 2024 06:31 PM2024-05-22T18:31:10+5:302024-05-22T18:50:25+5:30

Smita Sabharwal Success Story : आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा आहे.

सेलिब्रेटींप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचून अधिकारी बनलेले तरूण-तरूणी अनेकांसाठी आदर्श असतात.

तेलंगणातील आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल हे यातीलच एक नाव. त्या सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना देखील मात देतात. त्यांचा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

स्मिता यांचा जन्म १९ जून १९७७ रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी कर्नल म्हणून सेवा दिली. लहानपणापासूनच देशसेवेचे धडे कानावर पडल्यानंतर स्मिता यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला.

स्मिता यांनी १२ वी मध्ये असताना ICSE परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता.

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्या वयाच्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी सज्ज झाल्या अन् उत्तीर्ण देखील झाल्या.

त्या चौथ्या रँकसह उत्तीर्ण झाल्या. देशातील सर्वात तरूण आयएएस अधिकारी म्हणून त्यांना ओळख मिळाली. २२ व्या वर्षी अधिकारी झालेल्या स्मिता ह्या दिवसातील सहा तास अभ्यास करत असत.

स्मिता यांनी आयपीएस अधिकारी अकुन सभरवाल (IPS Akun Sabharwal) यांच्याशी विवाहगाठ बांधली.

खरे तर दोघांचेही वडील भारतीय सेनेत होते. त्यांना दोन अपत्ये असून, मुलाचे नाव नानक तर मुलीचे नाव भुविस असे आहे.

स्मिता ह्या मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या तेलंगाणा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

सर्व फोटो सौजन्य - Smita Sabharwal Instagram