Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी

Virat Kohli record in IPL playoffs, RCB vs RR: बंगळुरूचा आज राजस्थानशी सामना आहे. यातील पराभूत संघाचा या हंगामातील प्रवास संपणार आहे.

Virat Kohli record in IPL playoffs, RCB vs RR: विराट कोहलीचा RCB संघ आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध मैदानात उतरणार आहे. दोघांमध्ये प्ले-ऑफ्सचा सामना रंगणार असून पराभूत संघाचा या हंगामातील प्रवास आज संपणार आहे.

विराटच्या RCB ने आतापर्यंत एकदाही IPLची ट्रॉफी जिंकलेली नाही. पण गेल्या ६ सामन्यात सलग विजय मिळवून बंगळुरू संघाने प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवले आहे.

सुरुवातीच्या 8 पैकी 7 सामने गमावल्यानंतरही उर्वरित सहाच्या सहा सामने जिंकून RCBने हा पराक्रम केला. पण आता या सामन्यात पराभूत झाल्यास दुसरी संधी मिळणार नाही.

बंगळुरूला प्ले-ऑफ्स मध्ये पोहोचवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या स्पर्धेत विराटने सर्वाधिक धावा केल्या. पाहूया प्ले-ऑफ्समधील विराटची कामगिरी.

आतापर्यंत विराटने IPL मध्ये प्लेऑफ्स म्हणजेच बाद फेरीचे एकूण 14 सामने खेळले असून त्यात 308 धावा केल्या आहेत. 120 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकणाऱ्या विराट कोहलीची सरासरी 25 आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये विराटला एकदाही शतक ठोकता आलेले नाही परंतु त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. त्यामुळे आज कोहली कशी खेळी करतो याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.