शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल ११०० जण बेपत्ता; ७०४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 11:00 AM

पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले की, पाषाणकर यांनी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेले होते.

पुणे : पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल ११०० जण बेपत्ता झाले असून त्यापैकी ७०४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा स्थानिक पोलीस ठाण्यातून तपास केला जात असला तरी त्याच्या तपासावर पोलीस आयुक्तालयातून पाठपुरावा केला जातो. प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना तब्बल ३३ दिवसांनंतर शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले. यासाठी पुणे पोलिसांनी खुप प्रयत्न केले. स्वत: हून निघून गेलेली व्यक्ती उद्योजक असल्यामुळे पोलिसांनी इतके पोलीस बळ लावले होते. त्यांची कामगिरी वाखाणण्यायोगी असली तर इतर सामान्य व्यक्ती हरविली तर पोलीस इतका प्रयत्न करीत का असा प्रश्न त्यानिमित्याने उपस्थित केला जाऊ लागला होता.

याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले की, पाषाणकर यांनी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेले होते. त्यावेळी व्यावसायिक कारणावरुन त्यांचे अपहरण झाले का अथवा त्या कारणावरुन ते निघून गेले असावेत अशी शंका तक्रारीमध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी आपल्यापरीने सर्व तो प्रयत्न करुन त्यांचा शोध लावला.  १८ वर्षाखालील व्यक्ती जर घर सोडून गेली तर पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास करतात. सर्वसाधारण मिसिंगच्या तक्रारीत घरातील तात्कालिक कारण असते. त्याचा तपास स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत केला जातो. त्यांना तपासासाठी तांत्रिक सहाय्य सामाजिक सुरक्षा विभागाकडून देण्यात येते. 

मिसिंगच्या तक्रारीचे पुढे काय झाले, यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने जुन्या केसेसचा तपास करुन अनेक लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले आहे. अनेकदा हरविलेली व्यक्ती काही काळाने परत येते. परंतु, घरचे लोक ही बाब पोलिसांना कळवत नाही. अशीही अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. व्यक्ती व्यक्तीच्या तपासात पोलिसांकडून भेदभाव केला जात नाही. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यावर जबाबदारी देण्यात आलेली असते. त्यांना सामाजिक सुरक्षा विभागातून तांत्रिक सहाय्य केले जाते. मिसिंग तक्रारीबाबत काय तपास झाला. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे. बच्चनसिंह, पोलीस उपायुक्त, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस