शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आंबा तिपटीने घसरला

By admin | Updated: May 14, 2015 04:27 IST

फळांचा राजा अर्थात आंब्याचा दरवळणारा गंध आता पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये येत आहे. हातगाड्या, तसेच शहरभरातील चौकाचौकांत

पिंपरी : फळांचा राजा अर्थात आंब्याचा दरवळणारा गंध आता पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये येत आहे. हातगाड्या, तसेच शहरभरातील चौकाचौकांत आंब्याचे स्टॉल तसेच आंबा महोत्सव सुरू आहेत. परिणामी आवाक्याबाहेर असणाऱ्या आंब्याच्या खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली आहे.या वर्षी अनेकदा कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले. परिणामी सुरुवातीला हापूस आंबा मंडईत १४ डिसेंबर रोजी दाखल होताच त्याचा प्रतिडझनाचा भाव ९०० रुपये (प्रतिकिलोस ५०० रुपये) राहिला. मात्र आता आंब्याचा हंगाम जोरावर आहे. कोकणपट्ट्यातील देवगड, रत्नागिरी या भागातील अस्सल हापूस आंब्याने बाजारपेठ सजली आहे. त्यातच इतरही प्रकारच्या आंब्यांचे पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध झाल्याने हापूससह सर्वच आंब्यांचे दर आता नियंत्रणात आले आहेत. या संधीचा फायदा घेत ग्राहकांनी शक्य तितके आंबे खरेदी करून आमरसाचा बेत आखला आहे. सुरुवातीला हापूसचा प्रतिकिलोचा दर ४५० ते ५०० रुपयांपर्यंत होता. साध्या तोतापुरी आंब्याचीही विक्रमी १२० रुपयांनी विक्री व्हायची. या वेळी इतर आंब्यांचे फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे आंबा खाणे धनिकांव्यतिरिक्त इतरांच्या आवाक्याबाहेर होते. दरम्यान, अक्षय तृतीयेपासून कोकणातून पायरी, लालबाग, दक्षिण भारतातून बदाम आणि बेंगलोर हापूस हे पर्याय उपलब्ध झाले. मल्लिका, मलगो अशा आंब्यांचे पर्याय मिळाले आहेत. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून शहरभरात पिंपरीगाव, चिंचवड, पिंपळे गुरव, निगडी, प्राधिकरण, भोसरी, चिखली आदी भागात थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी दुकाने थाटली आहेत. आंबे फ्रिजमध्ये ठेवू नयेत अशी माहिती व्यापारी कुमार शिरसाट यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)