शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

मांडवगणला ४६ एकर ऊस खाक

By admin | Updated: October 19, 2015 01:56 IST

विजेच्या मुख्य लाइनच्या तारा तुटून येथील ४६ एकर ऊस खाक झाला. ही घटना आज (दि. १८) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली

मांडवगण फराटा : विजेच्या मुख्य लाइनच्या तारा तुटून येथील ४६ एकर ऊस खाक झाला. ही घटना आज (दि. १८) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तारांच्या ठिणग्या ऊसावर पडून आगीने रौद्ररूप धारण केले. गांधीलमाश्यांमुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांना यश आले.आगीत शेतकरी जगन्नाथ शितोळे यांचा ४.५ एकर, नामदेव शितोळे यांचा दीड एकर, एकनाथ शितोळे यांचा दीड एकर, लंकाबाई चकोर यांचा सव्वातीन एकर, मंगल शितोळे साडेतीन एकर, सुशीला फराटे यांचा साडेतीन एकर, विश्वंभर फराटे यांचा साडेतीन एकर, विठ्ठल नागवडे यांचा साडेचार एकर, बाबासाहेब नागवडे यांचा साडेचार एकर, संजय फराटे यांचा दीड एकर, अलका फराटे यांचा सव्वा एकर, शरद फराटे यांचा अडीच एकर, दशरथ फराटे यांचा पाच एकर, यशोदा फराटे यांचा तीन एकर, आंनदराव फराटे यांचा पावने तीन एकर असा एकूण ४६ एकर ऊस जळून खाक झाला आहे.शेतामध्ये वीजेचे खांब वाकलेल्या अवस्थेत आहेत. दोन खांबामधील तारा लोंबकळल्यामुळे हवेच्या प्रवाहाने या तारांचे घर्षण होऊन ऊसाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी ६ एकर ऊस जळाला होता; त्याचप्रमाणे इनामगाव येथे २६ एकर ऊस जळीत झाला होता. जुनामळा येथे शेतमजुराची झोपडी व संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. महावितरणने या तारा ओढून घ्याव्यात, अशी मागणी वारंवार येथील शेतकरी करत आहेत. पंरतु या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष होत आहे. त्वरित जळालेल्या ऊसाची भरपाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. जळालेल्या ऊसाचा पंचनामा तलाठी अमोल कडेकर, कोतवाल भाऊसाहेब खोमणे, कृषी सहायक बाळासाहेब फराटे, जयनुद्दीन सय्यद यांनी घटनास्थळी केला. (वार्ताहर)