Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:29 IST2026-03-26T16:25:59+5:302026-03-26T16:29:31+5:30

‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे सांगून ती नकार देत असताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Man arrested for luring minor girl into marriage; having physical relations, impregnating her | Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक

Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक

पुणे: सोशल मीडियावरून ओळख वाढवून कुत्रा दाखवण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत (वय २३, रा. बालाजी हाईटस, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १६ वर्षीय युवतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश राऊत याने या युवतीबरोबर सोशल मीडियावर ओळख वाढवली. तिला कुत्रा दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवले. ती घरी आल्यावर तिला ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे सांगून ती नकार देत असताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ‘हे सगळ कॉमन आहे,’ असे बोलून तिच्यासोबत पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर युवतीला उलटीचा त्रास होत नसल्याने तिची सोनोग्राफी केली. तेव्हा डॉक्टरांनी ती १० आठवड्याची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

Web Title: Man arrested for luring minor girl into marriage; having physical relations, impregnating her