शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:53 IST

- शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा सहकार पॅनल उभारण्याची केली घोषणा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २३ मे रोजी बारामतीत झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात गुरुशिष्य ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्या विरोधात पॅनल उभारण्याची घोषणा केली. त्याचवेळी मालेगाव कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळून दुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले. मात्र, आता शरद पवार गटानेदेखील माळेगावच्या रणसंग्रामात उडी घेत पॅनलची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या 'माळेगाव' मध्ये चुरशीच्या लढतीचे स्पष्ट संकेत आहेत.

शरद पवार गटाची शुक्रवारी (दि. ३०) बारामतीत बैठक झाली. यावेळी सर्वांनी एकत्र येत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार पॅनलच्या लढतीची घोषणा केली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात गुरुशिष्यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनलची घोषणा केली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी २७ मे रोजी स्वतःचाच 'ब' वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तो अर्ज कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्या धक्कातंत्राची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे. १३ जून रोजी ते त्यांच्या गटाचा चेअरमन पदाचा चेहरा पुढे आणणार आहेत.

शरद पवार गटाने 'छत्रपती'ला पूर्वीचे दिवस आणायचे असल्याने सुरुवातीला पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला. मात्र, सर्वपक्षीय पॅनलमध्ये स्थान मिळाले नसल्याचा आरोप करीत 'छत्रपती'च्यानिवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शरद पवार गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. मात्र, शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीत सर्वांनी थेट बळीराजा सहकार बचाव पॅनलची घोषणा केली. तसेच शनिवारी (दि. ३१) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गोविंदबाग निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माळेगाव कारखान्याबाबत भेट घेत चर्चा केली. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात आता गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवारदेखील आमनेसामने येणार आहेत. मला माहिती नाही

अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गट माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उतरला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे शनिवारी (दि. ३१) बारामती दौऱ्यावर होते. पत्रकारांनी ज्येष्ठ नेते पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी 'मला माहिती नाही' अशा तीन शब्दांत तो विषय संपवला.

'सस्पेन्स' कायमअर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी २७मेला स्वतःचाच 'ब' वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे. १३ जून रोजी ते त्यांच्या गटाचा चेअरमन पदाचा चेहरा पुढेआणणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र