शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

पुणे 'जिल्हाधिकारी' पदासाठी 'थांबा'; कारण महाविकास आघाडीत पडद्यामागे सुरु आहे जोरदार रस्सीखेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 6:49 PM

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा

ठळक मुद्देपुणे जिल्हाधिकारी पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश अजूनतरी अधांतरी

पुणे : कोरोनाचा वाढता फैलावाच्या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर गेले काही ४ ते ५ दिवसांपासून हे पद रिक्त आहे. पुण्याची जबाबदारी कुणाच्या हाती द्यायची यावरून महाविकास आघाडीत बरीच खलबतें सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून जिल्हाधिकारी पदासाठी काही प्रमुख नवे चर्चेत आहे. त्यात पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला शह दिला आहे. आता राज्यात सत्तांतर झाले आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घेतले. पुन्हा एकदा एकदा पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजितदादा आक्रमक झाले आहे.  

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुणे दौऱ्यात अजित दादांचे पुण्याकडे लक्ष असल्याचे सांगितले होते. परंतु, आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी कुणा एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने हे पद अजूनही रिक्त आहे. 

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी विविध नवे आघाडीवर आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश देशमुख यांचे नाव उचलून धरताना शिवसेनेकडून जी श्रीकांत यांच्या नावाचा आग्रह करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघडीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे यांचे नाव पुढे केले असल्याची चर्चा आहे. नवल किशोर राम यांच्या जागेवर नवीन नियुक्तीसाठी राजकीय पक्षांमध्ये पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यात अजित पवारांसह प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या तरी पुणे जिल्हाधिकारी पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश अजूनतरी अधांतरी आहे.  

राज्यात एकीकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु असताना अजित दादांसारखे झटपट निर्णय घेण्यात हातखंडा असलेल्या नेत्याच्या अखत्यारीतील पुण्याबाबत मात्र निर्णय घेण्यात राज्य दरबारी दिरंगाई का होत आहे याबाबद्दल अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या घडीला पुणे जिल्हयाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हाती सोपविण्यात आला आहे.आगामी काळात पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीसाठी नेमके कुणाचे पारडे वरचढ ठरले हे स्पष्ट होईलच. परंतु सध्या पुण्यात कोरोनाने थैमान घातले असताना जिल्हाधिकारी पदासारखे प्रमुख पद जास्त काळ रिक्त ठेवणे नक्कीच योग्य ठरणार नाही. पण राजकीय समीकरणे बाजूला ठेवून कोरोना परिस्थितीला सक्षमपणे हाताळणाऱ्या अधिकाऱ्याची आजमितीला पुणे जिल्ह्याला अधिक गरज आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवारNavalkishor Ramनवलकिशोर रामState Governmentराज्य सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस