शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : विजया रहाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:46 PM

शासनाने महिलांच्या सुरक्षा अंतर्गत कायद्याचे फायदे अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम करण्यात येत आहे.  

ठळक मुद्देमहिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिर उद्घाटन

पिंपरी : महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदे तयार केले असून त्याकायदया अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असून संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे प्रतिपादन महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार,स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे,जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, क प्रभागअध्यक्षा यशोदा बोईनवाड, ई प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील नगरसदस्या, स्विनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, अनुराधा गोरखे,सुजाता पालांडे, सोनाली गव्हाणे, प्रियांका बारसे, साधना मळेकर, नगरसदस्य नामदेव ढाके,राजेंद्र गावडे, सहाय्यकआयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.रहाटकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग हे महिलांचे जीवनमान उंचावण्याचे काम करीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे तयार केले आहेत ते शेवटच्या घटकापर्यत पोहचवायचे आहेत. महिलांचे बचत गट ही खूप चांगली चळवळ आहे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बतच गटाच्या योजनांची माहिती दिली जाते. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महनगरपालिकेच्या माध्यमातून बचतगटांच्या उन्न्तीसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. महिलांना स्वावलंबी सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरात १५ हजारोंपेक्षा जास्त बचतगट स्थापन झाले आहेत. आपल्या कुटूबांला संपन्न बनविण्याची क्षमता महिलांमध्ये असते. महिला बचत गटांनायोग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.यावेळी शलाका साळवी व मिनल मोहाडीकर यांनी योजना व कायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बी. के. कोकाटे यांनी केले तर आभार  सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाVijaya Rahatkarविजया रहाटकरMaharashtraमहाराष्ट्र