शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

Maharashtra Lockdown : राज्य सरकारच्या आदेशात गोंधळ; पुण्यात व्यापारी वर्ग कोर्टात जाण्याच्या विचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 2:19 PM

राज्य सरकारने संचारबंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे.

पुणे: राज्य सरकारने संचारबंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. या गोष्टीला व्यापारी वर्गाचा पूर्ण विरोध आहे. एकीकडे लोकांनी बाहेर येऊ नये म्हणतात तर दुसरीकडे रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू होणार असल्याचेही जाहीर करतात.सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत या शब्दात पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी राज्य सरकारवरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांवरून व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. आंदोलनातून हा विरोध नोंदवल्यानंतर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत व्यापारी वर्गाने एक पाऊल मागे घेत दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला होता. याचवेळी राज्य सरकारच्या पूर्ण लॉकडाऊनला आमचा पाठिंबा असेल मात्र तो जाहीर केला नाहीतर तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने फत्तेचंद रांका यांनी  घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली नाही. याच निर्णयावरून व्यापारी वर्ग पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

याबाबत रांका म्हणाले,  राज्य सरकार एकीकडे रस्त्यावरच्या स्टॉलला परवानगी देते आहे. शहर रिक्षा, खासगी वाहतुकीला परवानगी देत आहे. त्याद्वारे कोरोनाचे संक्रमण होत नाही का? संचार बंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. याला आमचा पूर्ण विरोध आहे. सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत असेही रांका यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुण्यातील भीषण परिस्थिती अकडेवारीसह समजावून सांगितली. तसेच आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे दुकाने न उघडण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घ्यावी अशी विनंती केली. त्याचा मान ठेवत पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले आंदोलन स्थगित करत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार