शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Maharashtra Election 2019 : इतकी वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही कमळाचा आधार का घ्यावा लागतो..? अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:56 PM

... तर इतकी वर्षे काय केले?

ठळक मुद्देनिमगाव केतकीत हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकेची झोड

कळस : १९ वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही एखाद्या माणसाला कमळाचा आधार घ्यावा लागत असेल, तर इतकी वर्षे काय केले? असा प्रश्न कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना जाहीर भाषणातून विचारला. त्यांच्यावर टीकेची झोड उठविताना यंदा इंदापूरातच नव्हे तर राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आवाहन त्यांनी केले.निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे  उमेदवार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, दशरथ माने, जगन्नाथ मोरे, डॉ शशिकांत तरंगे, अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, भरतराजे भोसले उपस्थित होते.कोल्हे म्हणाले की, कितीही झालं तर कमळ हे  चार पेपरातच गुंडाळलं जातं. राखणदार नेमायचा असेल तर दुसºयाच्या घरात चोरी केलेल्याला आपण नेमतो का? मग, मेगा भरतीचे महापोर्टल करण्याचे काम त्या कंपनीला देण्यात आले. ज्या कंपनीचे काम मध्य प्रदेशमधील घोटाळ्यात ब्लॅक लिस्ट झाले होते. म्हणजे मेगा भरती होणारच नव्हती हे स्पष्टच होते. काय झाले मेगा भरतीचे? असा प्रश्न उपस्थित करुन अमोल कोल्हेंनी भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सत्ताधारी भाजपा सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेला शेती व्यवसाय देशोधडीला लावला.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी,  निर्णयाचे भांडवल करून भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. राज्यात तत्त्वत: कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात उद्योग, रोजगार निर्माण करून शेतकऱ्यांच्या मालाला समाधानकारक भाव मिळवून देईन, अशी आश्वासने भाजपा सरकारने दिली होती.  मात्र गेल्या पाच वर्षांत ते सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, या निष्क्रिय सरकारला घरी बसवा. तालुक्याच्या उज्वल भवितव्यासाठी विरोधकांच्या  भूलथापांना बळी न पडता विकासाची जाण असऱ्या भरणे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी भरणे यांनी म्हणाले की,  बँकेचे अधिकारी, संस्थाचे अध्यक्ष, सचिव यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी पण जशाच तसे उत्तर देईल.  बँक ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या ताब्यात आहे.  ज्या संस्थाना केडर सचिव नको असेल त्यांना बाहेर पडून नविन सचिव नेमणूक करण्यास परवानगी दिली जाईल. ———————————

टॅग्स :Indapurइंदापूरindapur-acइंदापूरBJPभाजपाDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019