शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: जाणीवपूर्वक सिंधिया यांचे विमान अडवून ठेवले; माजी आमदार मोहन जोशींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:01 IST

माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येणार होते.

पुणे : माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येणार होते. मात्र त्याचवेळी नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने एटीसी (एअर ट्रॅफिक कंटोल) यांनी सिंधिया यांना पुण्याकडे येताना रोखले, असा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. गुरुवारी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात सिंधिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सिंधिया अनुपस्थित राहिले. याविषयीचे कारण स्पष्ट करताना जोशी यांनी भाजपवर टीका केली.ते म्हणाले, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सिंधिया यांना आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. सोलापूर येथील सभा घेऊन ते सायंकाळी साडेसहा वाजता वानवडी येथे येणार होते. परंतु त्याचवेळी सिंधिया यांना सोलापूरवरून उड्डाण करण्यास एटीसीने मज्जाव केल्याचे समजले. याचे मुख्य कारण सिंधिया यांनी एटीएसला विचारले असता त्यांनी "पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला त्याठिकाणी जाता येणार नाही," असे सिंधिया यांना सांगितले. एकीकडे एटीसीने सुरक्षाचे कारण देत असली तरी त्यावेळी पुणे विमानतळावर वेगवेगळ्या खासगी कंपनीच्या विमानचे उड्डाण सुरू होते. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या विमानाने  लोहगाव विमानतळावरून टेक ऑफ केले. मात्र त्यांच्या विमानाला एटीएसने कुठली हरकत घेतली नाही. एका बाजूला मोदींची सभा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या मित्र पक्षातील मंत्री विमानाने प्रवास करतात हे चालते. परंतु विरोधी पक्षांतील नेत्यांच्या विमान प्रवासाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो.भाजपने जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. मोदी यांची सभा पुण्यात आयोजित केल्यापासून टिळक रस्ता, शास्त्री रस्ता दुपारी बारा पासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्ते बंद करण्यात आले होते. या सगळ्यात सत्ताधारी पक्षाची हुकूमशाही दिसून आल्याची टीका जोशी यांनी केली. फुले सभागृहातच्या आवारात पार पडलेल्या सभेला पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नूतन शिवरकर, माजी खासदार रजनी पाटील, शिवाजी केदारी, सचिन तावरे, विनोद मथुरावाला, संगीता तिवारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019