शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 ; पुण्यात राज ठाकरेंची रद्द झालेली सभा होणार १४ तारखेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:18 IST

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी  ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

पुणे : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी  ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. राज यांनी गणरायाची आरती करुन त्याला निवडणूकीत मोठ्या संख्येने यश मिळावे याकरिता साकडे घातले.

        विधानसभा  निवडणूकीचा प्रचार आता रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. राज यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांना प्रचारास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी (9) सरस्वती विद्या मंदिरात राज यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ईडीची कारवाई मागे लागल्यापासून जाहीररीत्या कुठलेही वक्तव्य करण्यास टाळणारे यादिवशी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यादिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे ती सभा रद्द करावी लागली. यामुळे अनेकांची निराशा झाली. सभास्थानी झालेल्या राडारोड्यामुळे आयोजकांची पंचाईत होऊन बसली. 

       गुरुवारी राज कसबा गणपतीचे दर्शन घेणार असल्याची बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरली. त्यांनी मोठ्या संख्येने कसबा गणपती समोर गर्दी केली. दर्शन घेण्याकरिता राज दहा वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात साडेअकरा वाजता राज कसबा गणपती मंदिरात आले. कार्यकर्त्यांनी ताशे आणि फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी अनिल शिदोरे, शहरप्रमुख अजय शिंदे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुहास निम्हण, पुणे कँन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनिषा सरोदे यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर राज हे माध्यमांशी संवाद साधणार असे वाटत होते. मात्र पत्रकारांनी त्यांना त्यासंबंधी विचारणा केली असता त्यावर ते काहीही न बोलता आपल्या पुढील  प्रवासाकरिता मार्गस्थ झाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेRainपाऊसPoliticsराजकारणElectionनिवडणूक