Maharashtra Election 2019 : dattatray bharne's wife active in promoting of husband at indapur | Maharashtra Election 2019 : इंदापूरमध्ये पतीच्या प्रचारासाठी सौभाग्यवती सक्रिय
Maharashtra Election 2019 : इंदापूरमध्ये पतीच्या प्रचारासाठी सौभाग्यवती सक्रिय

ठळक मुद्दे पत्नी, स्नुषा उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात 

कळस  :  इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कुटुंबातील महिला प्रचारात उतरल्या आहेत. यामध्ये आमदार भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, स्नुषा अनुष्का भरणे आदींचा समावेश आहे.
पक्षाचा झेंडा घेऊन घोषणा देणाऱ्या, प्रचारपत्रकांच्या वाटपापासून ते भेटीगाठीपर्यंतच्या कामात आमदार भरणे यांच्या कुटुंबातील महिलांचाही मोठा सहभाग दिसून येत  आहे. गेल्या दोन दिवसांत भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील पोंदवडी, डाळज नं. १, २, ३, कुंभारगाव, धुमाळवाडी, भिगवण स्टेशन, बंडगरवाडी, मदनवाडी, डिकसळ, बिल्ट कंपनी, तक्रारवाडी गावांचा दौरा आयोजित केला होता. प्रचारात महिला कार्यकर्र्त्यांची उपस्थिती होती. पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. प्रचारात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देत ‘आमच्या मामाला मत द्या’, असे आवाहन गावांमध्ये जाऊन करत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. सुमन दराडे, शीतल वणवे, मेघना बंडगर, वंदना शेलार, जयश्री धुमाळ, आम्रपाली बंडगर, हेमाताई माडगे, सारिका बंडगर, ललिता वाकसे, रेखा पाचांगणे, अरूणा धवडे, नीलिमा भोगावत, पूजा देवकाते, सविता राक्षे, सुशीला थोरात, मंगल कुंभार, गौरी थोरात, लता चोपडे, संगीता थोरात, रंजनी भिसे या महिलांनी भाग घेतला.
.......
...सोशल मीडियावर देखील महिलांचे नियंत्रण 
४प्रचाराशिवाय महिला सोशल मीडियावरील प्रचाराची धुराही काही महिला कार्यकर्त्या सांभाळत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अकाउंटवरील अपडेट हाताळण्याचे काम त्या करत आहेत. याबरोबरच रोजच्या प्रचाराची क्षणचित्रेही वेगळ्या धाटणीत  मांडण्यात येत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 : dattatray bharne's wife active in promoting of husband at indapur

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.