राज ठाकरे औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्यात महापूजा; तब्बल २०० पुरोहित देणार शुभशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:23 PM2022-04-29T17:23:44+5:302022-04-29T17:25:24+5:30

भोंग्यावरून सरकारला इशारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले आहेत

Mahapuja in Pune before Raj Thackeray left for Aurangabad in 200 priests | राज ठाकरे औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्यात महापूजा; तब्बल २०० पुरोहित देणार शुभशीर्वाद

राज ठाकरे औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्यात महापूजा; तब्बल २०० पुरोहित देणार शुभशीर्वाद

Next

पुणे : भोंग्यावरून सरकारला इशारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले आहेत. १ मे ला जाहीर केलेल्या औरंगाबादमधील सभेसाठी शनिवारीच ते पुण्यातून निघणार आहेत. दरम्यान पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी पुण्यात थांबले आहेत. औरंगाबादला मार्गस्थ होण्याअगोदर पुण्यात १०० ते २०० गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

आज राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. सभा, महाआरती, त्यानंतर अयोध्या या सर्वांबाबत पुण्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजता पुण्यात महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पूजा होणार आहे. त्यांना पुढील कार्यासाठी यश मिळो असा शुभशीर्वाद गुरुजी देणार असल्याचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यानंतर वढू येथे ते जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ जाऊन आशीर्वाद घेतील. त्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे मार्गस्थ होतील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.  

पाच जूनला अयोध्येत जाणार

अयोध्येमध्ये पुण्यातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जावेत असे अपेक्षित आहे. त्याचे नियोजन करण्यात येईल. गुढीपाडव्याच्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मशिंदीवरील भोंगे काढण्याबाबत इशारा देऊन ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडवून दिला. त्यानंतर पुन्हा पुण्यात त्यांनी हनुमान जयंतीच्या मुहर्तावर महाआरती केली व अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सर्व मंदिरात महाआरती करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला. या सर्व गदारोळात त्यांनी औरंगाबादला १ मे रोजी सायंकाळी जाहीर सभाही आयोजित केली आहे. ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

महाआरतीसाठी ग्रीन सिग्नल

या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच ठाकरे पुण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिस चिंतीत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी त्यांच्याकडून काळजी घेण्यात येत आहे. ठाकरे पुण्यात मुक्काम करणार आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी स्थानिक नेत्यांबरोबर बैठक आयोजित केली असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये ते ३ मे च्या महाआरतीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेणार आहेत. तसेच ५ जूनच्या अयोध्या दौऱ्यात तिथे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना काही अडचणी आहेत का याचीही विचारणा ते करतील अशी माहिती मिळाली आहे. पुण्यातील स्थानिक नेत्यांनी अक्षय तृतीयेला करावयाच्या महाआरती संदर्भात शहरातील काही प्रमुख मंदिर व्यवस्थापनांबरोबपर संपर्क साधला असल्याचे समजते. व्यवस्थापनांनी त्यांना महाआरतीसाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Mahapuja in Pune before Raj Thackeray left for Aurangabad in 200 priests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.