शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

ढेकूळही फुटेना, खरीप हंगाम धोक्यात

By admin | Updated: July 15, 2014 04:07 IST

हंगामी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगरणीची ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत.

रांजणगाव गणपती : हंगामी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगरणीची ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत. पेरणीअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसू लागल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. नक्षत्राप्रमाणे ढोबळपणाने सात जूनला सुरू होणारा हंगामी पाऊस जुलै महिना अर्ध्यावर आला तरी अजून बरसत नसल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ निर्माण होऊ लागली आहे. सतत दुष्काळच्या छायेत गणला जाणारा शिरूर तालुका चासकमान, डिंभे धरणाच्या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम होत असला तरी निसर्गातील पावसाच्या सरी बरसल्याशिवाय भूजल पातळी वाढत नाही. वेळेवर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना वर्षभराचे शेतीचे नियोजन करणे सोयीचे जाते. शेतीत विविध पिके घेऊन निघालेल्या उत्पादनातून वर्षभराचे आर्थिक नियोजन करता येते. आता मात्र पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षी खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नातून पुढील हंगामातील पिकांचे बी बियाणे, खते, पिकांवरील औषधे, शेतमजुरी भागविता येते. परंतु, या वर्षी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडून गेले आहे. कोकण आणि मुंबईत पाऊस पडत आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.